Wipro Merger: विप्रो कंपनीचा मोठा निर्णय! 5 कंपन्यांचे होणार विलीनीकरण, काय आहे कारण?

Wipro Merger: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
Wipro Merger
Wipro MergerSakal
Updated on

Wipro Merger: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 2,667.3 कोटी रुपये आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय विप्रोनेही 5 कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे.

विप्रो कंपनीने आपल्या 5 उपकंपन्यांचे विलीनीकरण जाहीर केले आहे

  • विप्रो एचआर सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

  • विप्रो ओव्हरसीज आयटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

  • विप्रो ट्रेडमार्क होल्डिंग लिमिटेड

  • विप्रो व्हीएलएसआय डिझाईन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

  • विप्रो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली माहिती

विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) थियरी डेलपोर्टे यांनी म्हटले की व्यवसायात अनिश्चितता आहे तसेच महागाई आणि व्याजदर वाढले आहेत. ग्राहक त्यांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवत आहेत. ते म्हणाले की, ऑर्डरचे महसुलात रुपांतर होण्याचा वेग मंदावला आहे.

Wipro Merger
Dearness Allowance Hike: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची आणखी एक भेट, महागाई भत्त्यात केली 4 टक्क्यांनी वाढ

या कारणांमुळे होणार विलीनीकरण

Economic Times च्या अहवालानुसार विप्रोने विलीनीकरणाची कारणे दिली आहेत. यामध्ये व्यवसाय आणखी मजबूत करणे, प्रशासकीय, व्यवस्थापन आणि इतर खर्च कमी करणे. विलीनीकरणामध्ये, सर्व उपकंपन्या पूर्ण मालकीच्या आहेत त्यामुळे विलीनीकरणात नवीन शेअर्स दिले जाणार नाहीत. तसेच शेअर्सच्या पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही.

Wipro Merger
MSP Hike: शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात! सरकारने गहू आणि मसूरसह 6 रब्बी पिकांवर वाढवला MSP

कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण

सलग चौथ्या तिमाहीत विप्रोमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत 5,051 ने घट झाली आहे. यासह एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आता 2,44,707 झाली आहे. मात्र, कंपनीने सप्टेंबर महिन्यात 577 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.