Wipro: विप्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; पॅकेज 46% कमी केल्यानंतर आता...

विप्रोचे कर्मचारी दुहेरी समस्यांना तोंड देत आहेत.
Wipro
WiproSakal
Updated on

Wipro: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे कर्मचारी दुहेरी समस्यांना तोंड देत आहेत. आधी त्यांच्या पॅकेजमध्ये 46 टक्क्यांनी कपात करण्यात आली आणि आता त्यांना कंपनीतून कमी करण्याचा धोका आहे.

अगोदर विप्रो कंपनीच्या फ्रेशर्सचे पॅकेज 6.5 लाख रुपयांवरून 3.5 लाख रुपये करण्यात आले होते. त्यांना आता परीक्षा देण्यास सांगितले जात आहे.

हा एक फ्रेशर प्रोग्राम प्रोजेक्ट रेडिनेस प्रोग्राम (पीआरपी) आहे आणि कंपनीने या फ्रेशर्सना पाठवलेल्या मेलनुसार त्यांना पास होणे खूप महत्वाचे आहे.

या परीक्षेत ते नापास झाले तर त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. जानेवारीच्या सुरुवातीला, कंपनीने अंतर्गत परीक्षामध्ये अपयशी ठरल्याबद्दल 450 हून अधिक फ्रेशर्सना काढून टाकले होते.

असा आरोप आयटी युनियनचा आहे :

पुण्याच्या आयटी युनियनने विप्रोवर आरोप केला आहे की कंपनी जे काही करत आहे ते पूर्णपणे अनैतिक आणि अयोग्य आणि अन्यायकारक आहे. युनियनचा आरोप आहे की हे उमेदवार चार ते सहा महिन्यांपासून प्रशिक्षणाचा भाग आहेत.

या कार्यक्रमानंतर पुढील प्रशिक्षण होणार नाही असे आश्वासन कंपनीने दिले होते. प्रशिक्षण पॅकेज वार्षिक 3.5 लाखांवरून 6.5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा हा एक भाग होता. मात्र, आता पॅकेज कमी केल्यानंतर कंपनी आणखी एका प्रशिक्षणासाठी आग्रही आहे.

Wipro
Unemployment: भारतात पदवीधर तरुणांना रोजगार का मिळत नाही? 'या' अहवालातून आले समोर

नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटचे (NITES) अध्यक्ष हरप्रीत सलुजा म्हणतात की, ''अचानक बदललेल्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे''

विप्रोचा प्रोजेक्ट रेडिनेस प्रोग्राम काय आहे?

फ्रेशर्सना पाठवलेल्या मेलनुसार, टॅलेंट ट्रान्सफॉर्मेशनने हा कार्यक्रम कॅम्पस आणि कॅम्पसबाहेर कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केला आहे. नवीन कर्मचार्‍यांना तयार करण्यासाठी त्यांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये असणे गरजेचे आहे.

या प्रशिक्षणांतर्गत पीआरपी मूल्यमापन केले जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील. जर ते सप्लिमेंटरीमध्ये 60% गुण मिळवण्यात यशस्वी झाले नाहीत, तर HR त्यांना कंपनीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करेल.

Wipro
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.