Retail Sector: अंबानी-अदानींना बसणार मोठा धक्का! देशातील आघाडीची आयटी कंपनी उतरणार रिटेल क्षेत्रात

बाजारपेठेतील आपले स्थान मजबूत करणे आणि पॅकेज्ड फूड मार्केटचा विस्तार करणे असा कंपनीचा हेतू आहे.
Wipro Consumer Care set to buy foods brand Brahmins
Wipro Consumer Care set to buy foods brand BrahminsSakal
Updated on

Retail Sector: विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगने गुरुवारी केरळ-आधारित पॅकेज्ड फूड्स कंपनी ब्राह्मन्स फूड्सचे अधिग्रहण करण्यास सहमती दर्शविली, गेल्या वर्षी केरळमधील निरापारा ब्रँडची खरेदी केली.

संतूर साबण आणि यार्डले टॅल्क सारख्या लोकप्रिय ब्रँड्ससाठी ओळखल्या जाणार्‍या बेंगळुरूस्थित विप्रो कंझ्युमरने नीरापारा आणि ब्राह्मन्सचे अधिग्रहण करून पॅकेज फूड्स व्यवसायात मोठी झेप घेतली आहे.

बाजारपेठेतील आपले स्थान मजबूत करणे आणि पॅकेज्ड फूड मार्केटचा विस्तार करणे असा कंपनीचा हेतू आहे.

भारतीय पॅकेज्ड फूड मार्केट, ज्याचे मूल्य अंदाजे 5 ट्रिलियन आहे. मध्यमवर्गीय कुटुंबे अनब्रँडेड खाद्यपदार्थांमधून ब्रँडेड खाद्यपदार्थांकडे वळत आहेत.

या ट्रेंडने अनेक मोठ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमध्ये विविधता आणण्यासाठी आणि पॅकेज्ड फूड्स क्षेत्रात त्यांच्या ऑफरचा विस्तार करण्यास प्रवृत्त केले आहे.

ब्राह्मन्स कंपनी 1987 मध्ये स्थापन झाली. कंपनीची उत्पादने संपूर्ण केरळ आणि उर्वरित भारतातील मेट्रो शहरे आणि GCC देश, यूएस, यूके आणि ऑस्ट्रेलियासह परदेशी बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. डिसेंबरमध्ये, विप्रो कंझ्युमर केअरने KKR समूहाच्या मालकीची निरापारा कंपनी विकत घेतली.

Wipro Consumer Care set to buy foods brand Brahmins
Coca Cola: स्विगी-झोमॅटोला बसणार धक्का! कोका-कोलाची भारतात मोठी गुंतवणूक, फूड मार्केटमध्ये...

विप्रो कंपनीचे हे एकूण 14 वे अधिग्रहण आहे. विप्रो कंझ्युमरने यापूर्वी एनर्जी ड्रिंक्स ब्रँड ग्लुकोविटा आणि पर्सनल केअर ब्रँड यार्डले विकत घेतले होते.

कंपन्यांचे अधिग्रहण करुन कंपनी भविष्यात स्वतःचा पॅकेज्ड फूड ब्रँड लॉन्च करण्याचा विचार करत आहे. विप्रो आपल्या फूड्स व्यवसायाचा विस्तार करत आहे, असे विप्रो कंझ्युमर केअर येथील खाद्यपदार्थ व्यवसायाचे अध्यक्ष अनिल चुघ यांनी सांगितले.

विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगचे सीईओ आणि विप्रो एंटरप्रायझेसचे एमडी विनीत अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही नीरापारा कंपनीचे पहिले अधिग्रहण करून फूड क्षेत्रात प्रवेश केला आणि सहा महिन्यांत आम्ही ब्राह्मन्स कंपनीचे अधिग्रहण केले. ब्राह्मन्स हा केरळमधला एक मोठा ब्रँड आहे.

Wipro Consumer Care set to buy foods brand Brahmins
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()