महिलांची आर्थिक अधिसत्ता

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ ही म्हण आजही वापरली जात असली, तरीदेखील ‘जिच्या हाती आर्थिक दोरी ती घराते उद्धारी’ अशी परिस्थिती आली पाहिजे आणि यासाठी आपण महिलावर्गानेदेखील प्रयत्न करायला हवेत.
women financial system Important aspects of financial planning
women financial system Important aspects of financial planningSakal
Updated on

- रेखा धामणकर

महिला उत्तम मॅनेजर असतात, त्या घर अतिशय उत्तमरितीने सांभाळू शकतात, हे ऐकले, की असे वाटते की घरंच का? घराबाहेर आपण कमी पडतो का?

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ ही म्हण आजही वापरली जात असली, तरीदेखील ‘जिच्या हाती आर्थिक दोरी ती घराते उद्धारी’ अशी परिस्थिती आली पाहिजे आणि यासाठी आपण महिलावर्गानेदेखील प्रयत्न करायला हवेत. आर्थिक सुरक्षितता सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांच्या दृष्टीने तर फारच जिव्हाळ्याची असते आणि त्याचमुळे कदाचित त्या आर्थिक नियोजन उत्तमप्रकारे करू शकत असाव्यात.

आर्थिक नियोजनातील महत्त्वाच्या बाबी

महिलावर्गाकडे घरातील आर्थिक बाबींच्या नियोजनाची जबाबदारी दिली, तर त्या उत्तमरित्या ती पार पाडू शकतात. अर्थातच, यासाठी त्यांनी बाजारामध्ये उपलब्ध गुंतवणुकीचे विविध मार्ग शोधून, त्याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.

योग्य मार्ग निवडताना त्यांनी पुढील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे-

अ) गुंतवणूक लग्न, आजारपण, मुलांचे शिक्षण, व्यवसाय/उद्योग, भ्रमंती, निवृत्ती अशा कोणत्या बाबीसाठी करायची आहे. ते एकदा निश्चित झाल्यानंतर त्याचे तीन प्रकारात विभाजन करता येते.

नजीकच्या भविष्यकाळासाठी (१ ते ३ वर्षे), दीर्घकालीन भविष्यासाठी (३ ते १० वर्षे) आणि आयुष्यभरासाठी. यात अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठीही एक स्वतंत्र विभाग आवश्यक आहे.

ब) संबंधित विभागासाठी आवश्यक असणारी रक्कम ठरवावी. भविष्यकाळात आवश्यक असणारी रक्कम, त्यावर मिळणारे व्याज, व्याजदर, कालावधी यांचा विचार करणे गरजेचे आहे.

मासिक उत्पन्नाचे नियोजनः घरातील विविध प्रकारच्या खर्चांची महिलांना माहिती असते. त्यानुसार त्यांनी महिन्याचे बजेट तयार केले, तर फायदा होऊ शकतो. अर्थातच, नुसते बजेट तयार न करता ते पाळणे, त्याप्रमाणे खर्च करणे, महिन्याच्या शेवटी बजेट व प्रत्यक्ष खर्च याचा ताळेबंद मांडणे आवश्यक आहे. या बजेटमध्ये बचतीचा समावेश अनिवार्य आहे.

बचत खात्यामधील शिलकीच्या नियोजनाचा अभाव दिसून येतो. मोठ्या रकमा खात्यामध्ये पडून असतात व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकते. ऑटो स्विच टू एफडी, एसआयपी अशा अनेक गुंतवणूक मार्गांचा विचार करून या रकमेचे नियोजन करता येऊ शकते.

बहुतांश महिला बचत व गुंतवणूक यासाठी बचत खात्यामध्येच पैसे ठेवणे, मुदत ठेव, दागिने यापलीकडे काही करत नाहीत. महिलांनी शेअर, म्युच्युअल फंड आधुनिक गुंतवणुकीचे मार्ग हाताळायला सुरूवात करणे, ही काळाची गरज आहे.

कोणतीही गुंतवणूक ती कोणत्या वयात केली जाते, तेदेखील महत्त्वाचे ठरते. लग्नापूर्वीची वा लग्नानंतरची गुंतवणूक, तरुण व उतारवयातील गुंतवणूक यांत फरक करणे गरजेचे आहे. हा निर्णय घेताना प्रामुख्याने प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये असणारी जोखीम वा त्या जोखमीमुळे होणारे फायदे अथवा नुकसान व ते सहन करण्याची आर्थिक, मानसिक वा शारिरीक क्षमता लक्षात घेणे गरजेचे आहे.

प्रसूती किंवा मूल लहान असताना बऱ्याच महिला नोकरी किंवा व्यवसायाकडे पूर्णपणे पाठ फिरवताना दिसतात. अशावेळी अर्धवेळ (part-time) काम करून, आवडत्या छंदातून उत्पन्न मिळवता येऊ शकते, त्याचा गुंतवणुकीसाठी मोठा हातभार लागू शकतो.

या सर्व बाबींचा विचार करून महिलांनी आर्थिक अधिसत्ता मिळविणे आवश्यक आहे.

महिलाप्रिय गुंतवणूकप्रकार

सध्या महिलावर्ग भिशी, सोनेखरेदी, घरातच पैसे लपवून ठेवणे असे मार्ग अवलंबताना दिसतो. ही गंतवणूक होऊ शकते का, याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. ही बचत निश्चितच आहे, तथापि त्यावर उत्पन्न काहीच मिळत नसेल, तर ती गुंतवणूक होऊ शकत नाही. सोनेखरेदी ही एकवेळ गुंतवणूक होऊ शकते. मात्र, त्यामध्येही सोन्याची शुद्धता, घेतानाचे शुल्क, विकताना घेतली जाणारी घट यांचा विचार करायला हवा. गरज पडल्यास सोने विकून पैसे उभे करता येतात. मात्र, शक्यतो महिला सोने विकत नाहीत. म्हणूनच त्याला गुंतवणुकीचा दर्जा देता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.