Women's Day Best Gift Idea : आज 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन.. तुमच्या आयुष्यातली स्त्री दरदिवशी तुमच्यासाठी झटत असते. घर, दार अतिशय उत्तमरित्या सांभाळते. त्यामुळे आजचा हा महिला दिन तुमच्या आयुष्यातल्या या स्त्रीसाठी अविस्मरणीय बनवणे तुमचे कर्तव्य आहे. तुमच्या आयुष्यातील महिलांना असे गिफ्ट्स द्या ज्यामुळे त्यांचे आर्थिक भविष्य उज्ज्वल होईल.
काय द्यायचं याबाबत मनात गोंधळ सुरु असेल तर तुम्ही काय गिफ्ट्स देऊ शकता यासाठी आम्ही काही पर्याय सुचवत आहोत नक्की विचार करा.
तुम्ही एकरकमी रक्कम खर्च करू शकत असाल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील खास महिलेच्या नावावर ठराविक रकमेची एफडी (FD) करू शकता.
कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी, तुम्ही महिला दिनी त्यांच्या नावे एसआयपी (SIP) सुरू करू शकता. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक केली जाते. यामध्ये तुम्ही महिन्याला किमान 500 रुपयांची गुंतवणूक करु शकता. एसआयपीवर चक्रवाढीच्या फायद्यासह, तुम्हाला चांगले व्याज मिळते. दीर्घकालीन एसआयपीमध्ये सरासरी 12 टक्के परतावा मिळेल. अशा परिस्थितीत या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या भविष्यासाठी चांगली रक्कम जमा होऊ शकते.
तुमच्या आयुष्यातल्या स्त्रीसाठी सोन्याचे काही दागिने खरेदी करून तिला भेट देऊ शकता. महिलांना दागिन्यांची आवड असते. याशिवाय सोन्याचे दागिन्यांकडे एक गुंतवणूक म्हणूनही पाहता येऊ शकते, ज्याची किंमत काळानुसार वाढत जाणार आहे.
एलआयसीअंतर्गत एलआयसी आधार शिला योजनांसारख्या खास महिलांसाठीच्या योजना आहेत. तुम्ही त्यांच्या वयानुसार आणि गरजेनुसार त्यांच्यासाठी कोणतीही एलआयसी पॉलिसी खरेदी करू शकता आणि महिला दिनी त्यांना भेट देऊ शकता. यामध्ये तुम्ही दर महिन्याला प्रीमियम भरता. मॅच्युरिटीनंतर एकरकमी रक्कम तुमच्या आयुष्यातील महिलेसाठी अतिशय उपयोगाचे गिफ्ट असेल.
काय मग.. तुम्ही तुमच्या आयुष्यातील स्त्रीला, मग ती आई असो, पत्नी, मुलगी किंवा बहिण अगदी कोणत्याही रुपातल्या या स्त्री शक्तीला कोणते गिफ्ट देणार आहात?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.