Adani Group: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी TMC खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत अदानी समूहावर प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आता अदानी समूहाने प्रतिक्रिया दिली आहे. अदानी समूह म्हणाला की, काही गट आणि व्यक्ती आमचे नाव आणि प्रतिष्ठा खराब करण्यासाठी ओव्हरटाईम काम करत आहेत.
महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्यातील व्यवहाराचे भक्कम पुरावे वकील जय अनंत देहाडराय यांच्याकडे असल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.
अदानी समूहाने निशिकांत दुबे यांचे नाव न घेता आपल्या निवेदनात म्हटले आहे की जय अनंत यांनी महुआ मोईत्रा आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.
जय अनंत यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. अदानी समूहाचे म्हणणे आहे की संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांद्वारे गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपन्यांना विशेषत: लक्ष्य करण्यात आले आहे. अदानी समूहाचे म्हणणे आहे की, मोईत्रा यांनी हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतली आहे. अदानी समूहाचे सर्व आरोप हिरानंदानी ग्रुपने फेटाळून लावले आहेत.
रविवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी 'चौकशी समिती' स्थापन करण्याचे आवाहन केले होते.
दुसरीकडे, आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सांगत महुआ मोईत्रा म्हणाल्या की, 'माझ्यावरील चौकशीचे मी स्वागत करते, मात्र त्यापूर्वी लोकसभा अध्यक्षांनी निशिकांत दुबे यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण केली पाहिजे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.