अमेरिका, ब्रिटन नाही तर 'या' देशातील लोकांना आहे सर्वात जास्त पगार; भारत कोणत्या स्थानी? जाणून घ्या

अहवालात भारतासोबतच जगातील इतर देशांतील नागरिकांच्या मासिक पगाराचीही माहिती देण्यात आली आहे.
World Highest Paid Country
World Highest Paid CountrySakal
Updated on

World Highest Paid Country: 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. दरम्यान, भारतीयांचे सरासरी पगार 50 हजारांपेक्षा कमी असल्याचे एका अहवालात समोर आले आहे. या अहवालात भारतासोबतच जगातील इतर देशांतील नागरिकांच्या मासिक पगाराचीही माहिती देण्यात आली आहे. या यादीत असे 23 देश आहेत, ज्यांचे सरासरी वेतन 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

'या' 10 देशात लोकांना सर्वाधिक पगार मिळतो

जागतिक सांख्यिकी आकडेवारीनुसार, जगातील 10 देश लोकांना सर्वाधिक सरासरी पगार देत आहेत. यामध्ये स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग, सिंगापूर, यूएसए, आइसलँड, कतार, डेन्मार्क, यूएई, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.

जगाच्या तुलनेत भारत कुठे?

भारतापेक्षा सरासरी कमी वेतन देण्याच्या बाबतीत तुर्की, ब्राझील, अर्जेंटिना, इंडोनेशिया, कोलंबिया, बांगलादेश, व्हेनेझुएला, नायजेरिया, इजिप्त आणि पाकिस्तान हे देश आहेत.

मासिक वेतन देण्याच्या बाबतीत भारत जगात 65 व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 104 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिका चौथ्या क्रमांकावर आहे, तर चीन 44व्या क्रमांकावर आहे.

'या' देशातील लोकांना 4 लाखांहून अधिक पगार

जगातील अव्वल तीन देश असे आहेत, जिथे नागरिकांना सर्वाधिक पगार मिळतो. त्यांचे सरासरी मासिक वेतन 4 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. स्वित्झर्लंडमध्ये पगार 4,98,567 रुपये आहे, लक्झेंबर्गर्समध्ये सरासरी मासिक पगार 4,10,156 रुपये आणि सिंगापूरमध्ये लोकांना 4,08,030 रुपये दरमहा मिळतात.

सरासरी मासिक पगार असलेल्या देशांची यादी:

  • स्वित्झर्लंड: $6,096 (रु. 4,98,567)

  • लक्झेंबर्ग: $5,015 (रु. 4,10,156)

  • सिंगापूर: $4,989 (रु. 4,08,030)

  • यूएसए: $4,245 (रु. 3,47,181)

  • आइसलँड: $4,007 (रु. 3,27,716)

  • कतार: $3,982 (रु. 3,25,671)

  • डेन्मार्क: $3,538(रु. 2,89,358)

World Highest Paid Country
Campa Cola: कॅम्पा कोलासाठी मुकेश अंबानी करणार मुथय्या मुरलीधरनसोबत पार्टनरशीप; काय आहे करार?
  • दुबई: $3,498 (रु. 2,86,087)

  • नेदरलँड: $3,494 (रु. 2,85,756)

  • ऑस्ट्रेलिया: $3,391 (रु. 2,77,332)

  • नॉर्वे: $3,289 (रु. 2,68,990)

  • जर्मनी: $3,054 (रु. 2,49,771)

  • कॅनडा: $2,997 (रु. 2,45,109)

  • यूके: $2,924 (रु. 2,39,139)

  • फिनलंड: $2,860 (रु. 2,33,905)

  • ऑस्ट्रिया: $2,724 (2,22,782 रुपये)

  • स्वीडन: $2,721 (2,22,534 रुपये)

  • फ्रान्स: $2,542 (2,07,894 रुपये)

  • जपान: $2,427 (रु. 1,98,489)

  • दक्षिण कोरिया: $2,243 (रु. 1,83,441)

  • सौदी अरेबिया: $2,002 (रु. 1,63,731)

  • स्पेन: $1,940 (रु. 1,58,660)

  • इटली: $1,728 (1,41,322 रुपये)

  • दक्षिण आफ्रिका: $1,221 (99,857 रुपये)

  • चीन: $1,069 (रु. 87,426)

  • ग्रीस: $914 (रु. 74,749)

  • मेक्सिको: $708 (57,902 रुपये)

  • रशिया: $645 (रु. 52,750)

  • बांगलादेश: $255 (रु. 20,854)

  • व्हेनेझुएला: $179 (रु. 14,639)

  • नायजेरिया: $160 (रु. 13,085)

  • पाकिस्तान: $145 (11,858 रुपये)

World Highest Paid Country
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()