- प्रसाद भागवत, आर्थिक क्षेत्राचे अभ्यासक
गेल्या सोमवारी जगातील बहुतेक शेअर बाजार उघडलेच ते मुळी ‘गुलाबी काही नाही, सारे लाल लाल..’ अशा अवस्थेत. नेहमीच्याच युद्ध, मंदी या कारणांबरोबरच बाजार धारातीर्थी पडण्याचे प्रमुख कारण म्हणून विश्लेषकांकडून एक नवी संज्ञा पुढे आली, ती म्हणजे ‘येन कॅरी ट्रेड’. काही दिवसांपूर्वी जपानच्या मध्यवर्ती बॅंकेने व्याजदर ०.१० टक्क्यांवरुन ०.२५ टक्के केले आणि हेच बाजारातील उत्पाताचे कारण आहे, असा विश्लेषणाचा सर्वसाधारण सूर होता.