Yes Bank-DHFL Case: अविनाश भोसले यांना रुग्णालयात का हलवले? प्रकृतीत सुधारणा का नाही? कोर्टाने मागवला रिपोर्ट..

Yes Bank-DHFL Case: कोर्टाने या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Yes Bank-DHFL Case
Yes Bank-DHFL CaseSakal
Updated on

Yes Bank-DHFL Case: PMLA कोर्टाने जेजे हॉस्पिटल कडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांच्या बाबत रिपोर्ट मागवला आहे. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अविनाश भोसले यांना जीटी रुग्णालयात का हलवण्यात आले आणि एवढे दिवस रुग्णालयात भर्ती असून देखील अद्याप त्यांची परिस्थिती का सुधारत नाही असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहेत.

वैद्यकीय सुविधेचा गैरवापर होत असल्याच्या अरोपानंतर कोर्टाने विचारणा केली आहे. छाब्रिया यांना दहा दिवसांपूर्वी जे जे रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते.

छाब्रिया यांना जे जे रुग्णालयात भरती केलं जात असतानाच अविनाश भोसले यांना जी टी हॉस्पिटलमध्येच का भर्ती केलं आहे यावर देखील न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. जे जे रुग्णालयाकडून याबाबतचा तपशीलवार अहवाल न्यायालयाने मागवला आहे.

Yes Bank-DHFL Case
UPI Transaction: लोकांचा ऑनलाइन व्यवहारांवरील विश्वास वाढला, ऑगस्टमध्ये UPI ने केला सर्वोच्च विक्रम

रेडियस डेव्हलपर ही बांधकाम कंपनी छाब्रिया यांच्या मालकीची आहे. सीबीआयने छाब्रिया यांच्या सहा ठिकाणी छापे घातले होते. छाब्रिया यांची कंपनीन डीएचएफएलची सर्वात मोठी थकबाकीदार आहे.

कंपनीला डीएचएफएलचे 3 हजार कोटीचे देणे बाकी आहे. सीबीआयने 2020 मध्ये येस बँक घोटाळा प्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे वाधवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Yes Bank-DHFL Case
Mukesh Ambani: कुठे सीईओ मिळेल का? नवीन कंपनीसाठी अंबानी सीईओच्या शोधात

2018 एप्रिल ते जूनच्या काळात हजारो कोटी रुपये एका खआत्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले होते. त्यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा सहभाग होता. यात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा व गोएंका यांचा समावेश होता. या प्रकरणी सीबीआने छापेमारीही केली होती. या प्रकरणात अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()