Yes Bank layoffs: येस बँकेने इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; नोकऱ्या आणखी कमी करण्याची योजना, शेअर्स कोसळले

Yes Bank layoffs: भारतातील मोठ्या 10 खाजगी बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बँक आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करत आहे, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
Yes Bank layoffs
Yes Bank layoffsSakal
Updated on

Yes Bank layoffs: भारतातील मोठ्या 10 खाजगी बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बँक आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करत आहे, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बँकेकडून कर्मचारी कपातीची ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा बँकेने नुकतेच शेअर बाजाराला सांगितले होते की, कर्ज सुरक्षिततेच्या माध्यमातून निधी उभारण्याची घोषणा केली आहे.

इकॉनॉमिक टाईम्स (ईटी) च्या अहवालानुसार, येस बँकेने पुनर्रचनेचा एक भाग म्हणून किमान 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आगामी काळात आणखी कर्मचारी कपात होण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

येस बँकेने अनेक विभागांमध्ये ही कपात केली आहे. कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा परिणाम शाखा बँकिंग विभागात दिसून आला.

कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार देण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे नियम वेगवेगळे असतात. साधारणपणे कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्यास तीन महिन्यांचा पगार अगोदर दिला जातो.

Yes Bank layoffs
Moody’s: पाणीटंचाई भारताच्या प्रतिष्ठेला घातक; देशात सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता, मूडीजचा धक्कादायक अहवाल

येस बँकेच्या कर्मचारी कपातीचे कारण डिजिटल बँकिंग आहे का?

येस बँक डिजिटल बँकिंगकडे वाटचाल करत आहे आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून खर्च कमी करू इच्छित आहे. एक्सचेंजेसला दिलेल्या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या माहितीमध्ये बँकेने म्हटले होते की 2023-2024 (FY24) आर्थिक वर्षात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चात 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 23च्या अखेरीस 3,363 कोटी रुपयांवरून हा खर्च FY24 च्या अखेरीस 3,774 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. FY24 मध्ये येस बँकेचा निव्वळ नफा 74.4% ने वाढून रु. 1,251 कोटी झाला आहे.

Yes Bank layoffs
Wedding Cost: भारतात शिक्षणापेक्षा विवाह सोहळ्यांवर सर्वात जास्त खर्च; एका लग्नात होतोय तब्बल एवढ्या लाखांचा चुराडा

येस बँकेचे शेअर्स कोसळले

येस बँकेच्या शेअरच्या किमतीत आज घसरण झाली. सकाळी 9:25 वाजता बँकेचे शेअर्स 0.21% खाली 23.97 वर व्यवहार करताना दिसले. बँकेचे शेअर्स शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 24.02 वर बंद झाले, तर आज ते 24.03 वर उघडले. येस बँकेच्या शेअर्सनी 1 वर्षात सुमारे 49 टक्के परतावा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.