Steel Industry Problem : स्टील उद्योगाच्या मागण्या सरकारकडे मांडणार - योगेश मानधानी

Challenges faced by Steel Industry in India : मुंबईत १८ व १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘स्टीलएक्स २०२४’ प्रदर्शनामध्ये उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहनदेखील करण्यात आले.
Steel Industry Problem
Steel Industry ProblemSakal
Updated on

Jalna News : स्टील उद्योगांतील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘आयफा’ सस्टेनेबल स्टील मॅन्युफॅक्चरर असोसिएशच्या वतीने जालना स्टील क्लस्टर व महाराष्ट्रातील स्टील उद्योजकांची येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

स्टील प्रकल्पांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करून एक राष्ट्र एक वीज दर, ग्रीन स्टील उत्पादनांसाठी हरित उर्जेच्या वापरासाठी नियामक बदल, स्टील वापरात वाढ, संशोधनासाठी अनुदान आदी मागण्या केंद्राकडे मांडणार असल्याचे ‘आयफा’चे अध्यक्ष योगेश मानधानी यांनी सांगितले.

मुंबईत १८ व १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘स्टीलएक्स २०२४’ प्रदर्शनामध्ये उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. यावेळी ‘आयफा’चे सचिव कमल अग्रवाल, एमिरिटस अध्यक्ष गोपाल गुप्ता, उपाध्यक्ष अनिल गोयल, पश्चिम विभागाचे अध्यक्ष दिनेश अग्रवाल यांच्यासह जालना स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल, नितीन काबरा, अरुण अग्रवाल, यशराज पित्ती आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.