Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येचे नाव पुन्हा एकदा जगाच्या पटलावर आले. अनेक मोठ्या कंपन्यांनी येथे हॉटेल आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली आहे. रातोरात अयोध्येतील जमिनींचे दर अनेक पटींनी वाढले. दरम्यान, यूपीच्या योगी आदित्यनाथ सरकारने टाटा समूहाची कंपनी टाटा सन्सला अवघ्या 1 रुपयांच्या वार्षिक भाड्यावर जमीन दिली आहे. सरकारच्या मंत्रिमंडळानेही या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने टाटा सन्सला 90 वर्षांसाठी 1 रुपये वार्षिक भाड्याने जमीन भाड्याने दिली आहे. या जमिनीवर टाटा सन्स मंदिराचे संग्रहालय उभारणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून 650 कोटी रुपये खर्च करून मंदिराचे संग्रहालय बांधणार असल्याचे टाटा सन्सने म्हटले आहे. अयोध्येच्या मांझा जामतारा गावात हे संग्रहालय बांधले जाणार आहे.
मंदिराचे संग्रहालय बांधण्यासोबतच टाटा सन्स 650 कोटी रुपये खर्च करणार आहे. या संग्रहालयाच्या देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारीही टाटा सन्स घेणार आहे. असा अंदाज आहे की सरकार संग्रहालयासाठी सुमारे 2 एकर जागा 90 वर्षांसाठी वार्षिक 1 रुपये भाड्याने देईल.
राम मंदिराच्या उद्घाटनापासून दररोज सुमारे 2 ते 4 लाख लोक अयोध्येत दर्शनासाठी येतात. संग्रहालये आणि इतर पर्यटन स्थळांचा विकास झाल्यानंतर येथील पर्यटकांची संख्या आणखी वाढू शकते. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा सांगतात की, मंदिराचे संपूर्ण काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, तर पहिल्या मजल्यावरील काम जुलैअखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
योगी सरकार लखनौ, प्रयागराज आणि कपिलवस्तुमध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार आहे. यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या हेलिपॅडच्या उभारणीची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे. सर्वसामान्यांनाही या सेवेचा फायदा होणार असून, त्यासाठी त्यांना भाडे मोजावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.