Nithin Kamath: झिरोधाच्या ग्राहकाची 5 कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न, नितीन कामत यांचा खुलासा

Nithin Kamath Warning: ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन कामत यांनी नवीन घोटाळ्याबद्दल लोकांना सतर्क केले आहे.
Zerodha's Nithin Kamath warns about new scam with impersonators offering a massive reward
Zerodha's Nithin Kamath warns about new scam with impersonators offering a massive reward Sakal
Updated on

Nithin Kamath Warning: ब्रोकरेज फर्म झिरोधाचे संस्थापक नितीन कामत यांनी नवीन घोटाळ्याबद्दल ग्राहकांना सतर्क केले आहे. बक्षिसाच्या नावाखाली लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. असाच एक घोटाळा उघडकीस आला आहे ज्यात एका व्यक्तीने झिरोधाचा कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकाकडून करोडो रुपये चोरण्याचा प्रयत्न केला.

स्कॅमरने क्लायंटला सांगितले की त्याला बक्षीस मिळणार आहे पण त्यासाठी त्याला आधी 1.8 लाख रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. ग्राहकाला विश्वासात घेण्यासाठी घोटाळेबाजाने बनावट बँक स्टेटमेंटही दिले. क्लायंटने पेमेंट केले नाही ही दिलासादायक बाब आहे आणि सर्वांनी सतर्क राहावे यासाठी झिरोधाला चौकशी करण्यास सांगितले.

Zerodha's Nithin Kamath warns about new scam with impersonators offering a massive reward
CWC 2023: क्रिकेटमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करुन देशाला किती फायदा होतो?

फसवणुकीचा प्रयत्न कसा झाला?

झिरोधाचे संस्थापक निखिल कामत यांनी सांगितले की, एका घोटाळेबाजाने झिरोधाचे बनावट कर्मचारी ओळखपत्र तयार केले. त्यानंतर तो एका क्लायंटला भेटला. स्कॅमरने क्लायंटला सांगितले की त्याला झिरोधाकडून बक्षीस मिळाले आहे.

मात्र, यासाठी त्याला नोंदणी शुल्क म्हणून 1.8 लाख रुपये जमा करावे लागतील, ते जमा केल्यानंतर त्याला 5 कोटी रुपये मिळतील. क्लायंटला पटवून देण्यासाठी त्याने झिरोधाचे बनावट बँक स्टेटमेंट दाखवले ज्यात दोन बँकांमध्ये 10 कोटी रुपये शिल्लक होते. मात्र ग्राहकाने तात्काळ पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी झिरोधाशी संपर्क साधला, ज्यामुळे तो वाचला.

Zerodha's Nithin Kamath warns about new scam with impersonators offering a massive reward
InterGlobe Aviation: इंटरग्लोब एव्हिएशनला 1,666 कोटींची कर नोटीस; काय आहे प्रकरण?

गुंतवणूकदारांना सावध करत कामत म्हणाले की, आजकाल काही लोक बनावट क्लोन अॅप्सच्या मदतीने स्टेटमेंट, लेजर आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या बँक खात्यांचे व्हिडिओ बनवत आहेत. हे लोक बनावट स्क्रीनशॉटसह व्हिडिओ दाखवतात. तुम्हाला बनावट क्लोन अॅप्सवर बनवलेल्या व्हिडिओंपासून सावध राहण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.