Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

Zimbabwe's ZiG: झिम्बाब्वेने मंगळवारी 'झिग' हे नवीन चलन सुरू केले आहे. जुन्या चलनाच्या जागी हे चलन आणण्यात आले आहे. एप्रिलच्या सुरुवातीला झिग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्यात आले होते, परंतु आता लोक ते नोट आणि नाण्यांच्या स्वरूपात वापरू शकतात.
Zimbabwe's ZiG is the world's newest currency and its latest attempt to resolve a money crisis
Zimbabwe's ZiG is the world's newest currency and its latest attempt to resolve a money crisisSakal
Updated on

Zimbabwe's ZiG: झिम्बाब्वेने मंगळवारी 'झिग' हे नवीन चलन सुरू केले आहे. जुन्या चलनाच्या जागी हे चलन आणण्यात आले आहे. एप्रिलच्या सुरुवातीला झिग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्यात आले होते, परंतु आता लोक ते नोट आणि नाण्यांच्या स्वरूपात वापरू शकतात.

हा झिम्बाब्वेमध्ये दीर्घकाळ सुरु असलेले चलन संकट थांबवण्याचा नवीन प्रयत्न आहे. सरकारने यापूर्वी झिम्बाब्वे डॉलर बदलण्यासाठी विविध कल्पना मांडल्या होत्या, ज्यात महागाई रोखण्यासाठी सोन्याची नाणी आणि डिजिटल चलन आणणे यासारख्या पर्यायांचा समावेश होता. मात्र, असे असूनही लोकांचा यावर विश्वास बसत नाही. काही सरकारी विभागांनीही ते स्वीकारण्यास नकार दिला आहे.

Zimbabwe's ZiG is the world's newest currency and its latest attempt to resolve a money crisis
Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

2009 मध्ये डॉलरच्या पतनानंतर झिम्बाब्वेने वापरलेले झिग हे सहावे चलन आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी प्रथम अमेरिकन डॉलरला कायदेशीर दर्जा देण्यात आला, त्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली आणि नंतर बंदी उठवण्यात आली.

लोक अजूनही झिग घेण्यास नकार देत आहेत. अमेरिकन डॉलर अजूनही त्यांना सुरक्षित वाटतो. गॅस स्टेशन, झिग स्वीकारण्यास नकार देत आहेत. पासपोर्ट विभागासारखी काही सरकारी कार्यालयेही फक्त अमेरिकन डॉलर स्वीकारत आहेत.

Zimbabwe's ZiG is the world's newest currency and its latest attempt to resolve a money crisis
Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

2009 मध्ये, झिम्बाब्वेमध्ये महागाई वाढली, त्यानंतर तेथील अर्थव्यवस्था कोलमडली. ती रुळावर आणण्यासाठी, अनेक वेळा नवीन चलन जारी केले गेले. पण तिथली परिस्थिती अजून सुधारलेली नाही. झिम्बाब्वेने एकेकाळी अमेरिकन डॉलर हे चलन बनवले होते.

यावर नंतर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ही बंदीही हटवण्यात आली आहे. आता तेथील लोकांचा या नव्या चलनावर विश्वास राहिलेला नाही. मिंटच्या वृत्तानुसार, एका भाजी विक्रेत्याने सांगितले की तो नवीन चलन स्वीकारणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.