Zomato Profit: 'अरे त्यासाठी घरोघरी जाऊन'..., झोमॅटोनं यंदा कमावले किती? ट्रोल करणाऱ्या ट्विटनं दिलं उत्तर

Zomato Net Profit: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato च्या पहिल्या तिमाहीचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Zomato Profit
Zomato ProfitSakal
Updated on

Zomato Net Profit: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato च्या पहिल्या तिमाहीचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नफ्याबाबत ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडत आहे. कंपनीच्या नफ्यावर यूजर्स जोक्स शेअर करत आहेत, अशाच एका यूजरचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याने झोमॅटोच्या सीईओला उद्देशून लिहिले, 'भाई माझ्याकडून 2 कोटी घ्यायचे ना.''

पहिल्यांदाच 2 कोटींचा नफा

कंपनीने गुरुवारी आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. Zomato ने प्रथमच नफा नोंदवला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 2 कोटी रुपये आहे, तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 186 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, झोमॅटोचा महसूल जून 2023 च्या तिमाहीत वार्षिक आधारावर सुमारे 71 टक्क्यांनी वाढला आहे.

Zomato Profit
Sahara Refund: CRCS सहारा रिफंड पोर्टलवर दावा करण्याची शेवटची तारीख कोणती, कधी मिळतील पैसे?

सीईओने हे ट्विट 'ट्विट ऑफ द डे' असे म्हटले

Zomato ने निकाल जाहीर केल्यानंतर कंपनी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी कंपनीच्या पहिल्या नफ्याबद्दल सीईओ दीपंदर गोयल यांचे अभिनंदन केले आहे, तर अनेकांनी विनोदी पद्धतीने टोमणा मारला आहे.

वीरेंद्र हेगडे नावाच्या ट्विटर युजरने लिहिले की, 'भाई माझ्याकडून 2 कोटी घ्यायचे ना, घरोघरी जाऊन अन्न पोहोचवण्याची काय गरज होती.' या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सीईओ दीपंदर गोयल यांनी लिहिले, 'ट्विट ऑफ द डे'

Zomato Profit
Supreme Court: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, जामीन अर्जावर विचार करण्यास दिला नकार

दरम्यान, पेटीएमचे सीईओ, विजय शेखर शर्मा यांनी या यशाबद्दल झोमॅटो टीमचे अभिनंदन केले आणि गोयल यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. झोमॅटोच्या निकालाचा आणि प्रथमच नफ्यात आल्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे. शुक्रवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच झोमॅटो स्टॉक रॉकेटच्या वेगाने धावू लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.