TATA Group: ऐतिहासिक निर्णय! टाटांच्या कंपनीमध्ये लागू होणार आरक्षण; वंचितांना मिळणार समान संधी

कंपनीने यापूर्वीच ट्रान्सजेंडरसाठी सवलत दिलेली होती. त्यासह आता वंचित आणि अपंगांसाठीही कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे. टाटांच्या जमशेदपूर येथील प्लांटमध्ये तृतीयपंथियांसाठी सर्व सोयी-सुविधा आहेत. स्वतंत्र स्वच्छतागृहेदेखील आहेत.
TATA Group: ऐतिहासिक निर्णय! टाटांच्या कंपनीमध्ये लागू होणार आरक्षण; वंचितांना मिळणार समान संधी
Updated on

नवी दिल्लीः हजारो कोटींच्या दातृत्वामुळे कायम चर्चेत असलेला टाटा ग्रुप आता आणखी एका ऐतिहासिक निर्णयामुळे चर्चेत आलेला आहे. रतन टाटा हे कायम देशासमोर आदर्श निर्माण करत असतात. आता त्यांच्या टाटा ग्रुपने कंपनीमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जदशेदपूर इथल्या टाटा स्टील कंपनीमध्ये काही समूदायांना नोकऱ्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अपंग, वंचित आणि LGBTQ+ समूदायातील व्यक्तींना टाटा स्टील प्राधान्यक्रमाने नोकरी देणार आहे. टाटा स्टीलने अशा ठाराविक लोकांना २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

TATA Group: ऐतिहासिक निर्णय! टाटांच्या कंपनीमध्ये लागू होणार आरक्षण; वंचितांना मिळणार समान संधी
Monsoon Session 2024 : लाडकी बहीण योजना! महिन्याला मिळणार दीड हजार रुपये? मध्य प्रदेशमध्ये गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्रात? काय आहेत निकष?

टाटा स्टीलमधील वरिष्ठ अधिकारी जयसिंग पांडा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, प्रत्येकाला समान अधिकार मिळवून देणं ही एक जबाबदारी आहे. विविधता ही आपली ताकद आहे.. यामुळे कामातील नाविन्यपूर्णतेला बळ मिळेल.

कंपनीने यापूर्वीच ट्रान्सजेंडरसाठी सवलत दिलेली होती. त्यासह आता वंचित आणि अपंगांसाठीही कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे. टाटांच्या जमशेदपूर येथील प्लांटमध्ये तृतीयपंथियांसाठी सर्व सोयी-सुविधा आहेत. स्वतंत्र स्वच्छतागृहेदेखील आहेत.

TATA Group: ऐतिहासिक निर्णय! टाटांच्या कंपनीमध्ये लागू होणार आरक्षण; वंचितांना मिळणार समान संधी
Mobile Bill: जुलैपासून मोबाईलवर बोलणे महागणार! कंपन्या दर वाढवण्याच्या तयारीत; किती वाढणार बिल?

जगभरातील LGBTQIA+ समुदाय जून महिना 'प्राइड मंथ' म्हणून साजरा करतात. भारतातील कॉर्पोरेट जग केवळ LGBTQIA+ समुदायातील लोकांना नोकऱ्या देत नाही तर त्याऐवजी या समुदायातील लोकांना प्रशिक्षण देऊन LGBTQIA+ टॅलेंट तयार करत आहे. टाटा कंपनीने एक या माध्यमातून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.