Adani-Ambani: रिलायन्सने खरेदी केले अदानी पॉवरचे 5 कोटी शेअर्स

Adani Power: देशातील या दोन बड्या उद्योगपतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी स्पर्धा सुरू असते.
Reliance buys 5 crore shares of Adani Power
Reliance buys 5 crore shares of Adani PowerEsakal
Updated on

Reliance Invests In Mahan Energen Limited:

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गौतम अदानी यांच्या मध्य प्रदेशातील पॉवर प्रोजेक्टमध्ये 26 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात पहिल्यांदाच व्यावसायिक भागिदारी झाली आहे.

दरम्यान मीडिया, हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात हे दोन्ही उद्योग समूह एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.

नुकतेच, दोन्ही कंपन्यांनी अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूक कराराबद्दल एक्सचेंजेसना माहिती दिली आहे.

रिलायन्सने अदानी पॉवरच्या महान एनर्जीन लिमिटेडमध्ये 10 रुपये किमतीला 5 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत.

भारतीय विद्युत नियम, 2005 अंतर्गत रिलायन्सने अदानी पॉवरच्या MEL युनिटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या दराराद्वारे रिलायन्सला एमईएलकडून 20 वर्षांसाठी वीज खरेदी करणार आहे.

Reliance buys 5 crore shares of Adani Power
Housing Sales: राज्यातील 'या' शहरांमध्ये घरांच्या मागणीत विक्रमी वाढ, किती वाढल्या किंमती?

अदानी कुटुंबाची अंबुजा सिमेंटमध्ये ६ हजार कोटींची गुंतवणूक

अदानी कुटुंबाने गुरुवारी अंबुजा सिमेंटमध्ये ६,६६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे जाहीर केले. यासह देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सिमेंट कंपनीतील त्यांचा वाटा 3.6 टक्क्यांनी वाढून 66.7 टक्के झाला आहे.

यापूर्वी, कंपनीचे प्रमोटर्स असलेल्या अदानी कुटुंबाने ऑक्टोबर 2022 मध्ये संचालक मंडळाने मंजूर केलेल्या वॉरंट जारी करण्यासाठी कंपनीमध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. अंबुजा सिमेंटचा एसीसी लिमिटेड या आणखी एका सिमेंट कंपनीमध्येही कंट्रोलिंग स्टेक आहे.

Reliance buys 5 crore shares of Adani Power
Crisil Limited Share : 4 वर्षात 308% परतावा ; आता प्रत्येक शेअरवर 28 रुपये डिव्हिडेंड देण्याची कंपनीची तयारी...

देशातील या दोन बड्या उद्योगपतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील पहिल्या दोन स्थानांवर पोहोचण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजला तेल आणि वायूपासून ते किरकोळ बाजारपेठा आणि दूरसंचार क्षेत्रापर्यंत रस आहे, तर अदानींचे लक्ष बंदरे ते विमानतळ, कोळसा आणि खाणकाम अशा पायाभूत सुविधांवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.