डॉ. दिलीप सातभाई
जुन्या खटल्यांसाठी फायदेशीर
सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केल्याच्या तारखेनंतर दाखल झालेल्या किंवा यापूर्वी दाखल केलेल्या, परंतु निकाली काढल्या गेलेल्या नसलेल्या सर्व अर्जांवर ते आवश्यक फेरफार लागू करतील. या मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याच्या तारखेपर्यंत प्रलंबित असलेल्या अर्जांसाठी, तडजोड शुल्क आधीच निर्धारित केले गेले असेल आणि सूचित केले गेले असेल, परंतु पूर्ण भरले नसेल, तर तडजोड शुल्क नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमी असेल, तर पुन्हा निर्धारित केले जाईल. मागील मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्धारित केलेले तडजोड शुल्क आधीच अदा केले असल्यास, इतर देय रकमेसाठी कोणताही परतावा किंवा समायोजन केले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एका कलमाच्या तडजोडीसाठी २५ हजार रुपये, तर अनेक कलमांच्या तडजोडीसाठी ५० हजार रुपये असे तडजोड शुल्क निश्चित करण्यात आले आहे.