वसंत कुलकर्णी
सध्या विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञांसह व्यापक एकमत आहे, की विशेषत: ग्रामीण भागात, उपभोगात पुनरुज्जीवन होण्यासाठी अनेक वर्षे पायाभूत सुविधा उभारणीवर आणि भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित केल्यानंतर, आता सरकार मागणी वाढविण्याच्या दृष्टीने सवलती देईल, अशी अपेक्षा आहे.
टाटा इंडिया कन्झ्युमर फंडाचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक सोनम उदासी यांच्या मते, कन्झम्शन ही थीम अनेक उद्योग क्षेत्रे व्यापणारी असून, गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा थोडा हिस्सा कन्झम्शन फंडात गुंतवणे फायद्याचे ठरेल.
अनुकूल लोकसंख्याशास्त्र, दरडोई उत्पनांतील वाढ आणि डिस्पोझेबल उत्पन्न, ग्राहकांच्या पसंतींत झालेले बदल अनेक उद्योगांची अनौपचारिकतेकडून औपचारिकतेकडे होणारी वाटचाल डिजिटायझेशन आदी घटकांमुळे ही थीम मजबूत होताना दिसत आहे. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
वसंत कुलकर्णी यांनी सोनम उदासी यांची खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली मुलाखत.