‘शेअर बाजार’ आणि ‘धोका’ या दोन शब्दांचे नाते जवळचे आहे. यातूनच ‘रिस्क मॅनेजमेंट’ म्हणजेच अशा धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या नुकसानाचे व्यवस्थापन करण्याचे शास्त्र उदयास आले आहे.
यातील ‘स्टॉपलॉस, ‘ॲव्हरेजिंग’ या पारंपरिक पद्धतींबरोबरच अलीकडे ‘डेरिव्हेटिव्हज’ची सुरुवात झाल्यानंतर ‘ऑप्शन्स’च्या माध्यमातून धोक्याचे व्यवस्थापन करणारी ‘हेजिंग’ ही संकल्पना लोकप्रिय झाली आहे.