Share Market Opening: शेअर मार्केटची सकारात्मक सुरुवात, निफ्टी 24,400 च्या पुढे, सेन्सेक्सही 770 अंकांनी वाढला

Share Market Today: शेअर मार्केटची सकारात्मक सुरुवात झाली आहे. निफ्टी-५० ही २२२.५५ अंकांनी वाढून २४,३३९.५५ वर गेली आहे. याचा अर्थ निफ्टीमध्ये ०.९२ टक्क्यांनी वाढ झालीये.
Share Market Opening
Share Market Opening
Updated on

नवी दिल्ली- गुरुवारी शेअर मार्केट घसरणीसह बंद झाला होता. त्यामुळे शुक्रवारी शेअर मार्केटची सुरुवात कशी होते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. शेअर मार्केटची सकारात्मक सुरुवात झाली आहे. निफ्टी-५० ही २२२.५५ अंकांनी वाढून २४,३३९.५५ वर गेली आहे. याचा अर्थ निफ्टीमध्ये ०.९२ टक्क्यांनी वाढ झालीये. सेन्सेक्स ७७१ अंकांनी वाढून ७९,६५६.९५ वर आला आहे. यात ०.९८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

अनेक शेअर्स हे हिरव्या रंगात सुरु झाले आहेत. बँक निफ्टी ३६३ अंक किंवा ०.७२ टक्क्यांनी वाढून ५०,५१९ वर गेली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात न केलेले बदल आणि जागतिक परिस्थितीमुळे काल शेअर मार्केट हा घसरणीसह बंद झाला होता. त्यामुळे आजची सुरुवात चांगली झाल्याचं म्हणावं लागेल.

NSE
NSE
Share Market Opening
Share Market Closing: शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला; मेटल शेअर्समध्ये मोठी विक्री

HCL टेक, टेक महिंद्रा यांच्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, बजाज फायनान्स, टाटा स्टिल, एनटीपीसी, टायटन, रिलायन्स, मारुती, एशियन पेंट, अदानी पोर्ट यांचे शेअर्स हिरव्या रंगामध्ये सुरु झाले आहेत. त्यामुळे दिवसभर या शेअर्सवर लक्ष असेल.

Share Market Opening
Stock Market Updates: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या, आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये ?

बँकांचे शेअर्स चांगले वधारले आहेत. एचीडीएफसी ०.६० टक्के, अॅक्सिस बॅक ०.३६ टक्के, कोटक बँक ०.२४ टक्के, आयसीसी बँक १.१६ टक्के, अशा पद्धतीने बँकांचे शेअर्स सराकात्मक स्थितीत आहेत. शेअर मार्केटमधील ही सकारात्मकता दिवसाच्या शेवटपर्यंत अशीच टिकून राहते का, हे पाहावं लागेल.

BSE
BSE

टॉप गेनर्स

निफ्टी-५० मध्ये आयशर मोटर्स, ओएनजीसी, टेक महिंद्रा, HCLटेक, LTIMindtree हे टॉप गेनर्स ठरले आहेत, तर एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स हा एकमेव शेअर आहे जो लाल रंगात सुरु झालाय. आयशर मोटर्सच्या शेअर्सची किंमत ४ टक्क्यांनी वाढले आहेत. GAIL च्या शेअर्सची किंमत २ टक्क्यांनी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.