एफओएमसी बैठकीच्या निकालापूर्वी बुधवारी बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली. व्यवहाराच्या शेवटी बेंचमार्क इंडेक्स किंचित वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 33.57 अंकांच्या अर्थात 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 69,584.60 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 19.90 अंकांच्या म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 20,926.30 वर बंद झाला.(Latest Marathi News)
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
बुल्सने खालच्या स्तरावरून चांगली रिकव्हरी केली ज्यामुळे निफ्टी 19.95 अंकांच्या वाढीसह 20,926.35 वर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. पॉवर स्टॉक्सने सर्वोत्तम कामगिरी केली. निफ्टीने डेली चार्टवर लॉन्ग लोअर शॅडोसह ड्रॅगनफ्लाय डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. हे बदलत्या ट्रेंडचे लक्षण आहे. आता इंडेक्स नवी रेंज 20,780-21,020 आहे. (Marathi Tajya Batmya)
सध्या सुरू असलेल्या कंसोलिडेशनचा टप्पा सुरू ठेवत बाजार किरकोळ वाढीसह बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. बाजारात आणखी कंसोलिडेशन दिसू शकते पण एकूणच ट्रेंड पॉझिटीव्ह आहे. ट्रेडर्सने हेजिंग रणनीतीसह निवडक शेअर्सचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला.(Latest Marathi News)
आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?
एनटीपीसी (NTPC)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)
पॉवरग्रीड (POWERGRID)
आयशर मोटर्स (EICHERMOT)
पीएफसी (PFC)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)
ऑरोफार्मा (AUROPHARMA)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
बंधन बँक (BANDHANBNK)
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.