UNO Minda Share : केवळ 89 हजारांचे 1 कोटी, कशी झाली ही कमाल ?

गाड्यांचे स्विच, हॉर्न आणि लाइट्स बनवणारी दिग्गज कंपनी युनो मिंडा (UNO Minda) या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याचे शेअर्स 6 रुपयांपेक्षा कमी किमतीवर होते आणि आता ते 660 रुपयांच्या पुढे आहे, म्हणजेच दहा वर्षांत गुंतवणूकदार 90 हजारांपेक्षा कमी गुंतवणूक करून कोट्यधीश झाले आहेत.
UNO Minda Share
UNO Minda Sharesakal
Updated on

गाड्यांचे स्विच, हॉर्न आणि लाइट्स बनवणारी दिग्गज कंपनी युनो मिंडा (UNO Minda) या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याचे शेअर्स 6 रुपयांपेक्षा कमी किमतीवर होते आणि आता ते 660 रुपयांच्या पुढे आहे, म्हणजेच दहा वर्षांत गुंतवणूकदार 90 हजारांपेक्षा कमी गुंतवणूक करून कोट्यधीश झाले आहेत. या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्यास वाव असल्याचा विश्वास ब्रोकरेज फर्मला वाटत आहे. बीएसईवर हा शेअर सध्या 663.05 रुपयांवर ट्रेड करत आहे.

युनो मिंडाचे शेअर्स 28 फेब्रुवारी 2014 रोजी फक्त 5.83 रुपयांवर होते. आता तो 663.05 रुपयांवर आहे, म्हणजेच 10 वर्षांत युनो मिंडाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे 88 हजारांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. गेल्या वर्षी 24 मार्च 2023 रोजी ते 433 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. या स्तरावरून, 10 महिन्यांत सुमारे 68 टक्क्यांनी झेप घेतली आणि 12 जानेवारी 2024 रोजी 726.85 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. मात्र, शेअर्सची ही तेजी थांबली आणि सध्या या उच्चांकावरून जवळपास 9 टक्के घसरण झाली आहे.

UNO Minda Share
Share Update : सीजी पॉवरच्या शेअर्समध्ये एका दिवसात तब्बल 11% टक्के वाढ

यूनो मिंडाचा स्विच व्यवसायात 67 टक्के मार्केट शेअर आहे. ही कंपनी स्विच, हॉर्न आणि लाइट्स सारखी उत्पादने बनवते. तो त्याच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये अधिक प्रोडक्ट्स जोडू शकतो. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये त्याचे ग्राहक वाढत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक वर्ष 2024 आणि आर्थिक वर्ष 2026 दरम्यान तिचा महसूल वार्षिक 27 टक्के चक्रवाढ दराने (CAGR) वाढू शकतो असा विश्वास ब्रोकरेज फर्म जिओजित बीएनपी परिबासचा आहे. या सर्व बाबींचा विचार करून ब्रोकरेजने आपले बाय रेटिंग कायम ठेवले आहे आणि टारगेट प्राइस 792 रुपये निश्चित केली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.