AVG Logistics Ltd Share Price: एवीजी लॉजिस्टिक्स लिमिटेडला (AVG Logistics Ltd) भारतीय रेल्वेकडून पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेन (PCET) भाडेतत्त्वावर देण्यासाठी 150 कोटी रुपयांचा करार मिळाला आहे. बेंगळुरू ते पंजाबमधील लुधियानाला जोडणारी ही विशेष ट्रेन पुढील सहा वर्षांत दर आठवड्याला एक फेरी पूर्ण करेल. हा प्रवास 72 तासांत पूर्ण करेल.
या करारामुळे आमचा महसूल तर वाढेलच, पण आमची क्षमता आणि कामगिरी वावण्यास मदत होईल असे एव्हीजी लॉजिस्टिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता म्हणाले. या कराराबाबत कंपनीने नुकतीच शेअर बाजाराला ही माहिती दिली.
लुधियानाचे रेल्वे नेटवर्कमध्ये अमूल्य योगदान आहे, जे कापड बाजार आणि सायकल उत्पादनासाठी मार्ग मोकळा करेल असे कंपनीने म्हटले. कंपनीच्या देशभरात 50 हून अधिक पूर्णपणे स्वयंचलित शाखा आहेत, जी रस्ते आणि रेल्वे वाहतूक, रीफर्स, कोल्ड चेन आणि वेअरहाउसिंग विभागांमध्ये सर्व्हिस देते.
भारतीय रेल्वेकडून 150 कोटी रुपयांच्या करारानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ झाली. मंगळवारी कंपनीचा शेअर 8 टक्क्यांच्या वाढीसह 345.50 रुपयांवर बंद झाला. YTD मध्ये, कंपनीच्या शेअर्सने 192.80 टक्के परतावा दिला आहे, जो 118 रुपयांवरून 345.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 227.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.