Stock Investing : 3 वर्षात 1700% तगडा परतावा, 150 कोटीच्या नव्या ऑर्डरमुळे उत्साह...

stock investment latest news in marathi |तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही गुजरात टूलरूम लिमिटेडच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.
1700 percent solid returns in 3 years 150 crore new orders excited
1700 percent solid returns in 3 years 150 crore new orders excitedSakal
Updated on

तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही गुजरात टूलरूम लिमिटेडच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. 20 रुपयांच्या खाली असलेल्या या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीला नुकतीच 150 कोटीची नवीन ऑर्डरही मिळाली आहे. नुकतीच कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. हा शेअर सध्या बीएसईवर 15.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप 181.99 कोटी झाले आहे.

कंपनीच्या 150 कोटीच्या मोठ्या इम्पेक्स ऑर्डरची चर्चा आहे, जी चालू तिमाहीत अंमलात आणली जाणार आहे. हे अंदाजे ऑपरेटिंग किंमत मार्जिन 5% - 10% देते. येत्या आठवड्यात आणखी ऑर्डर मिळण्याची आशा असल्याचे आहे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे.

कंपनीने नुकतीच रेवेन्यू आणि नेट प्रॉफिटमध्ये मजबूत वाढ नोंदवली आहे. त्याचा महसूल आर्थिक वर्ष 2023 मधील 2.41 कोटीवरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 556 कोटीपर्यंत वाढला. त्याच वेळी, कंपनीचा प्रॉफीट आफ्टर टॅक्स अर्थात करानंतरचा नफा वाढून 0.83 कोटी झाला आहे, जो आर्थिक वर्ष 2023 मध्ये सुमारे 1 कोटी होता.

1700 percent solid returns in 3 years 150 crore new orders excited
Standard Glass Lining IPO : 600 कोटीचा आयपीओ आणणार स्टँडर्ड ग्लास लायनिंग टेक्नॉलॉजी लिमिटेड...

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत त्याचा नफा 73 लाख होता. त्याच वेळी, एकूण उत्पन्न वाढून 377.35 कोटी झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 1.64 कोटी होते. ट्रेंडलाइनवर उपलब्ध माहितीनुसार, कंपनी मेडिकल डिस्पोजेबल,

फार्मा, फूड अँड बेव्हरेजेस पॅकेजिंग, रायटिंग इंस्ट्रुमेंट्स, कॅप्स आणि क्लोजर आणि ओरल हायजीन आर्टिकल्सच्या व्यवसायात आहे. जुलै 2021 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 0.87 रुपये होती. जो आज वाढून 15.60 रुपये झाला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी केवळ 3 वर्षांत सुमारे 1700 टक्के इतका मोठा नफा कमावला आहे.

1700 percent solid returns in 3 years 150 crore new orders excited
Trom Industries IPO : ट्रॉम इंडस्ट्रीजच्या आयपीओला शानदार सबस्क्रिप्शन, आज शेवटचा दिवस शिल्लक ?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.