आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावे असे कोणत्या पालकांना वाटत नाही. त्यामुळे मुल लहान असतानाच त्यांच्या नावे एखाद्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवले की ते मोठे होईपर्यंत तो एक मोठा फंड तयार होतो, मग त्यांच्या उच्च शिक्षणाच्या फीसाठी कोणतीही भीती राहात नाही. अशात तु्म्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये पैसे गुंतवू शकता.
बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर चांगले व्याजदर उपलब्ध आहेत. या योजनेद्वारे तुम्हाला तिप्पट परतावा मिळू शकतो,. म्हणजेच तुम्ही 5 लाखांची गुंतवणूक केल्यास ती 15 लाखापेक्षा जास्त होऊ शकते.
5 लाख 15 लाखांमध्ये रूपांतरित करण्यासाठी, तुम्हाला पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षांसाठी 5 लाख गुंतवावे लागतील. पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज देत आहे. अशा स्थितीत, सध्याच्या व्याजदरानुसार गणना केल्यास,
5 वर्षांनंतरची मॅच्युरिटी रक्कम 7 लाख 24 हजार 974 रुपये असेल, ही रक्कम न काढता पुढील 5 वर्षांसाठी फिक्स करा. अशाप्रकारे, 10 वर्षांमध्ये तुम्हाला व्याजाद्वारे 5 लाख 51 हजार175 रुपये मिळतील आणि तुमची रक्कम 10 लाख 51 हजार 175 रुपये होईल. ही रक्कम दुपटीहून अधिक आहे.
पुन्हा एकदा तुम्हाला ही रक्कम 5 वर्षांसाठी फिक्स केलीतर तुमची रक्कम एकूण 15 वर्षांसाठी जमा राहील. 15 व्या वर्षी, मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला 10 लाख 24 हजार 149 रुपये व्याजातून मिळतील. अशाप्रकारे, तुमचे गुंतवलेले 5 लाख आणि व्याज एकत्र केल्यास, तुम्हाला एकूण 15 लाख 24 हजार 149 रुपये मिळतील.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.