Utssav Cz Gold Jewels IPO : 70 कोटींचा उत्सव सीझेड गोल्ड ज्वेल्स लिमिटेड आयपीओ खुला, डिटेल्स जाणून घ्या...

उत्सव सीझेड गोल्ड ज्वेल्स लिमिटेड आयपीओ (Utssav Cz Gold Jewels IPO) आजपासून अर्थात 31 जुलैपासून खुला झाला आहे.
70 Crore Utsav CZ Gold Jewels Limited IPO Open From Today Know Details
70 Crore Utsav CZ Gold Jewels Limited IPO Open From Today Know DetailsSakal
Updated on

उत्सव सीझेड गोल्ड ज्वेल्स लिमिटेड आयपीओ (Utssav Cz Gold Jewels IPO) आजपासून अर्थात 31 जुलैपासून खुला झाला आहे. या आयपीओमध्ये 2 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ 69.50 कोटीचा एक बुक बिल्ट इश्यू आहे.

हा आयपीओ 63.18 लाखांचा फ्रेश इश्यू आहे. आयपीओचा प्राइस बँड 104-110 रुपये निश्चित करण्यात आला आहे. एका ऍप्लिकेशनसोबत कमीत कमी लॉट साइज 1200 शेअर्सची आहे. रिटेल इन्वेस्टर्ससाठी कमीत कमी गुंतवणुकीची रक्कम 1 लाख 32 हजार आहे.

आयपीओमधून मिळणारे निव्वळ उत्पन्न कंपनी खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरेल. मुंबईतील अंधेरी इस्टमधील मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी 8275 चौरस फुटांवर पसरलेली आहे आणि दरवर्षी 1500 किलो क्षमतेच्या विविध दागिन्यांचे उत्पादन करते.

70 Crore Utsav CZ Gold Jewels Limited IPO Open From Today Know Details
Acums Drugs & Pharmaceuticals IPO: 1856 कोटींचा एकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्सचा आयपीओ खुला, ग्रे मार्केटमध्ये मोठी मागणी...

कंपनीचे भारतातील 17 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेश तसेच इतर 2 देशांमध्ये ग्राहक आहेत. उत्सव सीझेड गोल्ड ज्वेल्स लिमिटेड 15 कॅड डिझायनर्सह मार्केट ट्रेंड आणि ग्राहकांच्या डिमांड्स पुर्ण करण्यासाठी दर महिन्याला 400 डिझाईन विकसित करतात. कंपनी 18K, 20K आणि 22K सीझेड गोल्ड आणि रोझ गोल्ड श्रेणींमध्ये हलक्या वजनाच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी ऑफर करते.

कंपनीचे प्रमोटर पंकजकुमार एच जगावत, शशांक भवरलाल जगावत आणि राकेश शांतिलाल जगावत आहेत. चॉइस कॅपिटल ऍडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड उत्सव सीझेड गोल्ड ज्वेल्स आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.तर आयपीओचे मार्केट मेकर चॉइस इक्विटी ब्रोकिंग आहे.

70 Crore Utsav CZ Gold Jewels Limited IPO Open From Today Know Details
Ashapura Logistics IPO : आशापुरा लॉजिस्टिक लिमिटेडचा आयपीओ खुला, जाणून घ्या डिटेल्स...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.