Fintrade India IPO : एक्मे फिनट्रेड इंडियाचा 54 वेळा सब्सक्राइब;26 जूनला काय होणार ? नफा की तोटा ?

एनबीएफसी एक्मे फिनट्रेड इंडियाचा (Fintrade India) आयपीओ 19 जूनला उघडला आणि 21 जूनला बंद झाला.
Fintrade India IPO
Fintrade India IPO sakal
Updated on

एनबीएफसी एक्मे फिनट्रेड इंडियाचा (Fintrade India) आयपीओ 19 जूनला उघडला आणि 21 जूनला बंद झाला. हा आयपीओ 54.49 वेळा सब्सक्राइब झाला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठीचा राखीव भाग 28.12 वेळा, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठीचा राखीव भाग 129.98 वेळा सब्सक्राइब झाला आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव भाग 44.58 वेळा सब्सक्राइब झाला. आता कंपनीच्या शेअर्सची लिस्टींग बीएसई आणि एनएसईवर 26 जूनला होणार आहे.

या आयपीओला आसान लोन्स आयपीओ ( Aasan Loans) असेही म्हणतात. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे 38 कोटी उभे केले होते. आयपीओसाठी प्राइस बँड 114 ते 120 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता आणि लॉट साइज 125 शेअर्स ठेवण्यात आली होता. 24 जूनला शेअर्सचे अलॉटमेंट निश्चित केले जाऊ शकते.

एक्मे फिनट्रेड इंडिया 1996 मध्ये स्थापन झाली. भारतातील ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागातील लोकांना प्रामुख्याने क्रेडिट सोल्यूशन्स प्रदान करते. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये लहान व्यवसाय मालकांसाठी वाहन व्हेहिकल फायनान्स आणि फायनान्स प्रॉडक्ट्स समावेश आहे. हे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात कार्यरत आहे. कंपनीचे प्रमोटर निर्मल कुमार जैन, मंजू देवी जैन, दीपेश जैन आणि निर्मल कुमार जैन HUF आहेत.

एक्मे फिनट्रेड इंडियाचा महसूल आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.06 टक्क्यांनी वाढून 69.57 कोटी झाला आहे. या कालावधीत 283.5 टक्क्यांच्या वाढीसह निव्वळ नफा 15.80 कोटी नोंदवला गेला. एप्रिल-डिसेंबर 2023 दरम्यान, कंपनीचा महसूल 53.45 कोटी होता आणि निव्वळ नफा 12.25 कोटी होता.

Fintrade India IPO
IPO Update : एज्युकेशन फोकस्ड एनबीएफसी आणणार आयपीओ; 3500 कोटी उभारण्याचा मानस

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.