Adani Group News : अदानींना दिलेल्या कर्जाबद्दल DLF चेअरमन म्हणाले, मोदींच्या आदेशानंतरच...

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली आहे.
Adani Group News
Adani Group NewsSakal
Updated on

Adani Group News : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या व्यावसायिक साम्राज्यात खळबळ माजली आहे. मात्र, रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज के. पी सिंह यांच असं मत आहे की, ''अदानी घटनेमुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास डळमळीत झालेला नाही.''

बँकांनी अदानी समुहाला मोदींच्या आदेशानुसार कर्ज दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल 24 जानेवारी रोजी आला. तेव्हापासून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होणार नाही :

डीएलएफचे चेअरमन के.पी सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ''हा केवळ एका कॉर्पोरेट ग्रुपचा तात्पुरता धक्का आहे.

त्यामुळे गुंतवणूकदारांचा भारताप्रती असलेला विश्वास कमी झालेला नाही. विकासाच्या मार्गावर राहण्यासाठी, अदानी समूहाला आपला भांडवली आधार वाढवणे आणि कर्ज कमी करणे आवश्यक आहे.''

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे सिंह यांनी दीड दशकांपूर्वी जेव्हा त्यांची रिअल इस्टेट फर्म डीएलएफ आयपीओ आणत होती. तेव्हा कॅनडाच्या एका कंपनीने अहवाल आणण्याची धमकी दिली होती याची आठवण करून दिली.

ते म्हणाले, ''त्यावेळी आम्ही कॅनेडियन कंपनीला जे करायचे ते करा, असे सांगितले होते.'' काही 'ब्लॅकमेलर' आहेत जे मोठ्या शेअर विक्रीच्या वेळी अहवाल आणतात.

Adani Group News
New Tariff Order : स्टार, सोनी, झी चॅनेल झाले बंद, 4.5 कोटी वापरकर्त्यांना धक्का, काय आहे कारण?

पंतप्रधानांच्या सांगण्यावरून कर्ज देण्यात आले होते का?

पंतप्रधानांच्या सांगण्यावरून बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिल्याच्या वृत्तावर सिंह म्हणाले, ''मला अदानीबद्दल माहिती नाही. पंतप्रधानांनी विचारले असता बँकवाले कर्ज देतील असे कोणाला वाटत असेल तर ते 'मूर्खांच्या जगात' जगत आहेत. कोणताही बँक अधिकारी हे करणार नाही.''

सिंह म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय समंजस व्यक्ती आहेत आणि जोपर्यंत ते पंतप्रधानपदी राहतील तोपर्यंत भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण राहील.

Adani Group News
स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

हिंडनबर्ग अहलावर अदानी समूहाचे म्हणणे आहे की, हे आरोप 'दुर्भावनापूर्ण', 'निराधार' आणि 'भारतावरील नियोजित हल्ला' असल्याचे म्हटले आहे. अहवालानंतर तीन आठवड्यांत, अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य 125 अब्ज डॉलरनी खाली आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.