Adani Group : गौतम अदानींना मोठा धक्का, सेबीने रेटिंग एजन्सींकडून मागवला तपशील, काय आहे कारण?

या बातमीमुळे अदानी ग्रुपच्या बहुतांश शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
Adani Group
Adani GroupSakal
Updated on

SEBI Action Against Adani Group : अदानी समूहाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. ग्रुपशी संबंधित सतत नकारात्मक बातम्या येत असतानाच आता आणखी एक बातमी समोर आली आहे. बाजार नियामक सेबीने रेटिंग एजन्सींकडून समूह कंपन्यांच्या रेटिंगबाबत माहिती मागवली आहे.

या बातमीमुळे अदानी ग्रुपच्या बहुतांश शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक सुमारे 7% खाली घसरला आहे.

रेटिंग एजन्सींकडून तपशील मागवला :

बाजार नियामक सेबीने रेटिंग एजन्सीकडून अदानी समूहाच्या कंपन्यांच्या रेटिंगची माहिती मागवली आहे. या अंतर्गत स्थानिक कर्ज आणि रोख्यांच्या रेटिंगवर तपशील मागवण्यात आला आहे.

कारण मोठ्या घसरणीमुळे अदानी समभागातील तरलता आणि कर्जाच्या पेमेंटवर परिणाम होऊ शकतो.

Adani Group
Share Market : गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! 'या' कंपनीने केली डिव्हिडेंडची घोषणा, प्रति शेअर मिळणार...

देशांतर्गत रेटिंग एजन्सी सेबीच्या नजरेत :

रेटिंग एजन्सींकडून तपशील मागवण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपन्यांच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल न होणे असे मानले जाते.

कारण समूह समभागांमध्ये इतकी मोठी घसरण होऊनही भारतातील एकाही रेटिंग एजन्सीने रेटिंग किंवा दृष्टीकोन बदललेला नाही.

शेअर्सच्या किंमतीत अचानक मोठी घसरण ही एक महत्त्वाची घटना आहे जी रेटिंग एजन्सीद्वारे घडवून आणली जाते. पण याउलट देशांतर्गत रेटिंग एजन्सींनी कंपन्यांच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल केला नाही.

Adani Group
..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले :

25 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अदानी समूहाच्या 10 सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती 21 ते 77 टक्क्यांनी घसरल्या आहेत. यामध्ये सर्वात मोठी घसरण अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये झाली आहे.

याशिवाय अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्येही या काळात मोठी घसरण दिसून आली आहे. गेल्या 4 दिवसांपासून अदानी पॉवरचे शेअर्स अपर सर्किट दाखवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.