Adani Stocks: हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले; काही सेकंदात 1.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Adani Stocks Today: अदानी समूहासाठी सोमवारचा दिवस पुन्हा एकदा 'ब्लॅक डे' ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालानंतर, सोमवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी समूहाचे शेअर्स सुरुवातीच्या सत्रात 17 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
Adani Stocks Today
Adani Stocks TodaySakal
Updated on

Hindenburg Research Report: अदानी समूहासाठी सोमवारचा दिवस पुन्हा एकदा 'ब्लॅक डे' ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी हिंडेनबर्ग रिसर्चच्या नवीन अहवालानंतर, सोमवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदानी समूहाचे शेअर्स सुरुवातीच्या सत्रात 17 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

सकाळी 9.15 वाजता बाजार उघडताच अदानी समूहाचे सर्व शेअर्स कोसळले. अदानी एनर्जी सोल्युशन्सने बीएसईवर सुमारे 17 टक्क्यांच्या घसरणीसह सुरुवात केली. सकाळी 9.30 वाजता बीएसईवर हा शेअर 2.59 टक्क्यांच्या घसरणीसह 1,075.45 रुपयांवर व्यवहार करत होता.

अदानीचे सर्व शेअर्स लाल रंगात

सकाळी 9.30 वाजता अदानी टोटल गॅसला सर्वाधिक 1.5 टक्के तोटा सहन करावा लागला. अदानी पॉवर आणि अदानी विल्मार यांचे शेअर्स प्रत्येकी 3 टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 2 टक्क्यांहून अधिक घसरला होता. त्याचप्रमाणे अदानी ग्रीन एनर्जी जवळपास अडीच टक्क्यांनी घसरला होता.

यापूर्वी, जानेवारी 2023 मध्ये जेव्हा हिंडेनबर्गने अदानी समूहाला प्रथमच लक्ष्य केले होते, तेव्हा अदानी समूहाच्या शेअर्सना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

अहवाल आल्यानंतर जवळपास महिनाभर अदानी समूहाचे शेअर्स घसरत राहिले आणि सतत लोअर सर्किटला बळी पडत होते. त्यावेळी अदानी समूहाचे शेअर्स 80 टक्क्यांहून अधिक घसरले होते आणि मार्केट कॅपला 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले होते.

Adani Stocks Today
Rahul Gandhi : हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून रण...राहुल गांधी यांचे गंभीर प्रश्न, ‘सेबीच्या अध्यक्षांचा राजीनामा का नाही?’

अदानी समूहाचे 1.28 लाख कोटी रुपयांचे नुकसान

आज शेअर बाजार उघडल्यानंतर काही सेकंदातच अदानी समूहाचे 1.28 लाख कोटी रुपये बुडाले. अदानीच्या बहुतांश शेअर्समध्ये 4 ते 6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे समूहाचे मार्केट कॅप 16 लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे.

अदानी समूहावर अहवाल जारी केल्यानंतर सुमारे 1.5 वर्षांनंतर, अमेरिकन शॉर्टसेलर हिंडेनबर्गने आणखी एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सेबी प्रमुख माधबी बुच यांचे पती धवल बुच यांचा अदानी समूहात हिस्सा आहे.

Adani Stocks Today
Hindenburg: सेबी प्रमुखांनी अहवालात केलेले आरोप काही प्रमाणात मान्य केले; हिंडेनबर्गच्या दाव्याने पुन्हा खळबळ

मात्र, या अहवालात अदानी समूहावर थेट कोणतेही नवीन आरोप करण्यात आलेले नाहीत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सेबी प्रमुखांनीही आपले निवेदन जारी केले आहे.

कारणे दाखवा नोटीस पाठवल्यामुळे अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी नाराज आहे, त्यामुळे ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते सेबी प्रमुख माधबी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याशिवाय हिंडनबर्ग अहवालाची चौकशी करण्याची मागणी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.