NSE Adani Group: गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपच्या बातमीने शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (21 नोव्हेंबर) समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर्स एकामागून एक नवीन नीचांक गाठत आहेत. अब्जावधी डॉलर्सच्या लाचखोरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात गौतम अदानी आणि इतर 7 जणांना अमेरिकन फेडरल कोर्टाने दोषी ठरवल्याच्या वृत्तानंतर, समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.