Adani Group: उद्योगपती गौतम अदानी जानेवारीपासून अडचणीत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स घसरले आहेत. तसेच अदानी समूहाच्या कर्जाचा बोजा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे.
गेल्या वर्षभरात समूहाच्या एकूण कर्जात सुमारे 21 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आता समोर आली आहे. अदानी समूहाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत मीडियामध्ये अनेक बातम्या येत आहेत. यापैकी ब्लूमबर्ग एजन्सीच्या अहवालात अदानी समूहाचे कर्ज 21 टक्क्यांनी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
परदेशी बँकांकडूनही भरपूर कर्ज घेतले :
ताज्या कागदपत्रांच्या आधारे ब्लूमबर्गने आपल्या बातमीत म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कर्जात विदेशी बँकांचा मोठा वाटा आहे. एकूण कर्जामध्ये विदेशी बँकांचा वाटा एक तृतीयांश झाला आहे.
समूहाने आपल्या गुंतवणूकदारांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, एकूण कर्जापैकी 29 टक्के कर्ज हे जागतिक आंतरराष्ट्रीय बँकांकडून घेतले आहेत. कंपनीच्या कर्जाशी संबंधित हे आकडे मार्च अखेरपर्यंतचे आहेत. तर 7 वर्षांपूर्वी अदानी समूहाच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये आंतरराष्ट्रीय बँकांचे नावं नव्हते.
उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाची आर्थिक स्थिती कशी बदलली हे या कागदपत्रांवरून दिसून येते. समूहाच्या कर्जदारांमध्ये देशी-विदेशी बँकांचा समावेश असल्याने अदानी समूहाची प्रगती किती आरामात झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमधील व्यावसायिक हितसंबंधांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेला व्यवसाय समूह बनला आहे. या कागदपत्रांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की अदानी समूहाची कर्ज फेडण्याची क्षमता सुधारली आहे.
अहवालात म्हटले आहे की, अदानी समूह जागतिक असल्याने समूहाने घेतलेल्या निर्णयांवर आंतरराष्ट्रीय बाजाराची नजर कायम असते. या कारणास्तव, अमेरिकेतील शॉर्ट सेलर ग्रुप हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहासंदर्भात अहवाल प्रकाशित केला होता.
फायनान्शिअल टाईम्सच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, अलिकडच्या वर्षांत एकूण विदेशी थेट गुंतवणुकीपैकी जवळपास निम्मी गुंतवणूक गौतम अदानी कुटुंबाशी संबंधित ऑफशोअर संस्थांमधून आली आहे.
काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी अदानी समूहावर 20,000 कोटी रुपयांच्या बनावट आणि फसव्या व्यवहाराचा आरोप केला होता. ज्यामुळे आता राजकारण तापले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.