Adani Group: सेबीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अदानी समूहाची प्रतिक्रिया; म्हणाले, मीडियाने...

हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध होण्याच्या तारखेपूर्वी आणि नंतरच्या बाजारातील घडामोडींचाही तपास करण्यात येत आहे.
Adani Group
Adani GroupSakal
Updated on

Adani Group Row: अदानी समूह जानेवारीपासून चर्चेत आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर समूहावर विविध आरोप होत असताना बाजार नियामक सेबीनेही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि अलीकडेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी आणखी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे.

आता या प्रकरणावर, अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की SEBI 25 जानेवारी 2023 रोजी एका परदेशी शॉर्ट-सेलरने अदानी समूहावर लावलेल्या आरोपांव्यतिरिक्त इतर अनेक तथ्यांची चौकशी करत आहे.

यामध्ये हा अहवाल प्रसिद्ध होण्याच्या तारखेपूर्वी आणि नंतरच्या बाजारातील घडामोडींचाही तपास करण्यात येत आहे. या तपशीलवार तपासासाठी अदानी समूह सेबीला पूर्ण सहकार्य करत आहे.

तपासाच्या निर्णयाचे अदानी समूहाने केले स्वागत:

अदानी समूहाने सांगितले की, आम्ही या चौकशीच्या निर्णयाचे स्वागत करतो कारण याद्वारे सर्व प्रकरणांची सुनावणी होईल आणि प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ मिळेल.

आम्ही सर्व नियम, कायदे आणि नियमांनी बांधील आहोत आणि विश्वास आहे की सत्याचा विजय होईल. आम्ही सेबीला पूर्ण सहकार्य करत आहोत आणि त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा देत आहोत. आम्ही सर्व कायद्यांचे पूर्णपणे पालन करत आहोत.

Adani Group
ED BYJU's Raid: ईडीच्या छाप्यावर बायजूने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, कर्मचाऱ्यांनी...

अदानी समुहाने असेही म्हटले आहे की सेबीने सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात कोणत्याही चुकीचे निष्कर्ष काढलेले नाहीत. सेबीच्या अर्जात केवळ शॉर्ट-सेलरच्या अहवालात केलेल्या आरोपांचा संदर्भ देण्यात आला आहे, ज्यांची चौकशी अद्याप सुरू आहे.

अदानी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही यावेळी मीडियाला सांगतोय की सेबी आणि सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे काम पूर्ण होण्याची आणि त्यांचे निकाल सादर होण्याची प्रतीक्षा करा.

विशेष म्हणजे, अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या अनियमिततेच्या आरोपानंतर अदानी ग्रुपच्या अडचणी खूप वाढल्या होत्या आणि तेव्हापासून अदानी ग्रुप वेगवेगळ्या कारणांनी बातम्यांमध्ये येत आहे.

Adani Group
Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.