Adani Ports: विप्रो सेन्सेक्समधून बाहेर; अदानी पोर्ट्सचा 30 कंपन्यांच्या यादीत प्रवेश

Adani Group Stocks: विप्रोला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉप 30 सेन्सेक्स कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडावे लागले आहे आणि हॉट सीटवर अदानी पोर्ट्सचा प्रवेश झाला आहे. अदानी पोर्ट्स सेन्सेक्सच्या टॉप 30 कंपन्यांमध्ये प्रवेश करणार आहेत.
Adani Ports
Adani PortsSakal
Updated on

Adani Group Stocks: विप्रोला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या टॉप 30 सेन्सेक्स कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडावे लागले आहे आणि हॉट सीटवर अदानी पोर्ट्सचा प्रवेश झाला आहे. गौतम अदानी यांच्या सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक असलेल्या अदानी पोर्ट्स सेन्सेक्सच्या टॉप 30 कंपन्यांमध्ये प्रवेश करणार आहेत.

गेल्या वर्षभरात अदानी पोर्ट्सच्या शेअरची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. ही कंपनी लवकरच भारतातील आघाडीच्या इक्विटी इंडेक्स सेन्सेक्समध्ये सामील होणार आहे.

S&P Dow Jones Indices ने शुक्रवारी जाहीर केले की 24 जूनपासून विप्रोला 30-कंपनींच्या यादीतून काढून टाकले जाईल आणि त्याच्या जागी अदानी पोर्ट्सचा समावेश केला जाईल. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये अलीकडच्या काळात स्थिर वाढ दिसून आली आहे आणि कंपनीने गेल्या वर्षी 97% परतावा दिला आहे, तर आयटी क्षेत्रातील विप्रोने या कालावधीत 16% परतावा देऊन खराब कामगिरी केली आहे.

Adani Ports
Indian RuPay Card: भारताचे रुपे कार्ड लवकरच मालदीवमध्ये होणार लॉन्च; मंत्री मोहम्मद सईद यांनी केली घोषणा

BSE निर्देशांकात मोठे बदल

बीएसईने केलेल्या घोषणेनुसार, केवळ सेन्सेक्समध्येच नाही तर बीएसई 100, सेन्सेक्स 50, सेन्सेक्स नेक्स्ट 50 आणि बीएसई बँक निर्देशांकांमध्येही बदल होतील. याशिवाय टाटा समूहाची रिटेल कंपनी ट्रेंट 24 जूनपासून सेन्सेक्स 50 मध्ये डिव्हिस लॅबची जागा घेईल.

या बदलांचा शेअर्सवर काय परिणाम होतो?

जर एखादा शेअर निर्देशांकात समाविष्ट केला असेल किंवा निर्देशांकातून बाहेर काढला असेल तर त्या शेअर्सच्या हालचालीवरही परिणाम होतो. जर एखादा शेअर निर्देशांकातून काढून टाकला गेला तर गुंतवणूकदार पैसे काढून घेऊ शकतात ज्यामुळे शेअर्स पडू शकतात.

Adani Ports
Silver Price Hike: चांदीच्या भावात विक्रमी वाढ का झाली? गेल्या 3 महिन्यांत किंमत 30 टक्के पेक्षा जास्त वाढली

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.