Gautam Adani : आणखी एक नवीन रिपोर्ट अन् अदानींना 3 दिवसात 80,000 कोटींचा दणका

गेल्या 3 दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniSakal
Updated on

Gautam Adani : हिंडनबर्गच्या अहवालाचा फटका बसलेल्या अदानी समूहाचे शेअर्स 27 फेब्रुवारीनंतर तेजीसह शेअर बाजारात व्यवहार करत होते, परंतु गेल्या 3 दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

याचा परिणाम अदानी समूहाला 80,000 कोटी रुपयांचा मोठा फटका बसला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजार भांडवल 8.23 टक्क्यांनी घसरले आहे. अवघ्या तीन दिवसांत अदानी समूहाचे मार्केट कॅप 23 मार्च रोजी 9,70,730 कोटी रुपये होते. सध्या मार्केट कॅप 8,90,750 कोटी रुपयांवर आले आहे. असे वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे.

अदानी समूहाच्या मार्केट कॅपमध्ये सोमवारी 29,931.64 कोटी रुपयांची आणि शुक्रवारी 594.18 कोटी रुपयांची घसरण झाली, असे कॉर्पोरेट डेटाबेस AceEquity च्या डेटावरून दिसून आले. (Adani stocks hit hard group m-cap drops Rs 80,000 crore to sub Rs 9 lakh crore level in 3 days)

समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर मंगळवारी 7.08 टक्क्यांनी घसरून 1,601.25 रुपयांवर आला आहे. तीन दिवसांत या कंपनीचा शेअर 11 टक्क्यांनी घसरला आहे. अदानी पोर्ट्सचा शेअर देखील 5.11 टक्‍क्‍यांनी घसरून 596.95 रुपयांवर पोहोचले आहे.

अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मार आणि एनडीटीव्हीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्क्यांनी लोअर सर्किटवर आले. अदानी समूहाचे दोन शेअर्स एसीसी आणि अंबुजा सिमेंट्स अनुक्रमे 4.22 टक्के आणि 2.91 टक्क्यांनी घसरले.

दुसरीकडे, NDTV चा शेअर तीन दिवसांत 13.77 टक्क्यांनी घसरला आहे. शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची मोठी घसरण नोंदवली गेली.

Gautam Adani
Gautam Adani: अदानी-हिंडेनबर्ग वादात PM मोदींच्या आर्थिक सल्लागाराचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

अंबुजा सिमेंट्स 3.49 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 4.78 टक्के, अदानी ट्रान्समिशन 6.32 टक्के शेअर्स घसरले आहेत. तीन दिवसांच्या कालावधीत एसीसी आणि अदानी टोटल गॅस प्रत्येकी 7 टक्क्यांनी घसरले आहेत.

द केनच्या अहवालामुळे समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अदानी समूहाने 2.15 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची प्रत्यक्षात परतफेड केली आहे का, असा प्रश्न या अहवालात उपस्थित करण्यात आला आहे.

अदानी समूहाने या महिन्याच्या सुरुवातीला 31 मार्चच्या मुदतीपूर्वी मार्जिन लिंक्ड इक्विटी-बॅक्ड फायनान्सिंगचे कर्ज पूर्ण करण्याची घोषणा केली होती.

अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनचे तारण ठेवलेले शेअर्स बँकेने कर्जाची परतफेड करण्याची घोषणा केल्यानंतर महिना उलटूनही तसेच आहेत, असा दावा त्यात करण्यात आला आहे.

Gautam Adani
जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()