Adani Stocks
Adani StocksSakal

Adani Stocks: गुंतवणूकदारांचा अदानींवर विश्वास कायम! समूहाच्या 10 पैकी 9 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तुफान तेजी

Adani Group Stocks: मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या 10 पैकी नऊ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. एक दिवस आधी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवारी अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
Published on

Adani Group Stocks: मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या 10 पैकी नऊ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. एक दिवस आधी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवारी अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आणि तो शेअर सहा टक्क्यांनी वाढला. अदानी टोटल गॅसचे शेअर्स चार टक्क्यांनी, एनडीटीव्हीचे 2.56 टक्क्यांनी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 2.55 टक्क्यांनी वाढले.

अदानी विल्मरचे शेअर्स 2.15 टक्के, एसीसी 1.93 टक्के, अदानी पॉवर 1.74 टक्के, अदानी पोर्ट्स 1 टक्के आणि अंबुजा सिमेंट्स 0.43 टक्के वाढले. सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली.

अमेरिकन संशोधन आणि गुंतवणूक कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर सोमवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती.

Adani Stocks
Patanjali: पतंजली दिशाभूल जाहिरात प्रकरणात बाबा रामदेव यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने मानहानीचा खटला केला बंद

हिंडेनबर्गने ताज्या अहवालात काय म्हटले आहे?

हिंडेनबर्गने शनिवारी रात्री उशिरा जारी केलेल्या आपल्या नवीन अहवालात असे म्हटले आहे की बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धबल बुच यांनी बर्म्युडा आणि मॉरिशसमध्ये ऑफशोर फंडांमध्ये गुंतवणूक केली होती.

हे तेच फंड आहेत ज्यांचा वापर विनोद अदानी यांनी निधीची उधळपट्टी करण्यासाठी आणि समूह कंपन्यांच्या शेअरच्या किमती वाढवण्यासाठी केला होता. विनोद अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू आहेत.

Adani Stocks
SEBI Chief: भाजप नेत्याने केली सेबी प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल

आरोपांना प्रत्युत्तर देताना, बुचांनी रविवारी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की ही गुंतवणूक 2015 मध्ये करण्यात आली होती. 2017 मध्ये सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी आणि मार्च 2022 मध्ये अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी ही गुंतवणूक केली होती. अदानी समूहानेही सेबी प्रमुखांशी कोणतेही व्यावसायिक व्यवहार झाले नाहीत असे स्पष्टीकरण दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.