Aditya Birla Group: आदित्य बिर्ला ग्रुपची पेंट व्यवसायात एंन्ट्री होताच गुंतवणूकदार झाले मालामाल

Aditya Birla Group: कंपनी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
Aditya Birla Group
Aditya Birla GroupSakal
Updated on

Aditya Birla Group: आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज पेंट व्यवसायात उतरणार आहे. कंपनीने पेंट व्यवसायाचे ब्रँड नाव जाहीर केले आहे. हा समूह बिर्ला ओपस या ब्रँड नावाने पेंटचा व्यवसाय सुरू करणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत बिर्ला ओपस लाँच करण्याची योजना आहे.

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले, पेंटचा व्यवसाय आदित्य बिर्ला ब्रँडच्या ताकदीवर आणि विश्वासावर आधारित असेल, असे ते म्हणाले. कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, येत्या काही वर्षांत ही कंपनी देशातील दुसरी सर्वात मोठी नफा कमावणारी पेंट कंपनी असेल.

एक्सचेंजला माहिती देताना कंपनीने सांगितले की, ग्रासिम इंडस्ट्रीज पेंट व्यवसायात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे प्लांट हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत ज्याद्वारे ते देशभरातील मागणी पूर्ण करतील.

सध्या पेंट्समध्ये नंबर वन कंपनी एशियन पेंट्स आहे. बर्जर पेंट्स आणि कान्साई नेरोलॅक पेंट्स देखील या क्षेत्रात आहेत. आदित्य बिर्ला समूह जेव्हा पेंट्स व्यवसायात उतरेल तेव्हा या कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

Aditya Birla Group
RBI Penalty: आरबीआयने चार सहकारी बँकांना ठोठावला दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Grasim share price (Source: Mint)
Grasim share price (Source: Mint)Sakal

गृहनिर्माण क्षेत्रातील प्रचंड वाढीमुळे पेंट्स उद्योगात दरवर्षी दुहेरी अंकी वाढ दिसून येत आहे. भारतात डेकोरेटिव्ह पेंट्सचा व्यवसाय वार्षिक सुमारे 70,000 कोटी रुपयांचा आहे.

कालच्या व्यवहारात ग्रासिम इंडस्ट्रीजचा शेअर 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह 1931.60 रुपयांवर बंद झाला. आदित्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक सिमेंट ही या क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

Aditya Birla Group
Multibagger Stocks: 8 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.