Aditya Birla Group : शेअर बाजारात सध्या जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळत आहे. बाजारातील या घडामोडीत निवडक शेअर्सवर फोकसमध्ये आहेत. असाच एक शेअर बिर्ला ग्रुपचा आहे, ज्यात 12 मार्चला बाजार उघडताच प्रचंड वाढ दिसून आली.
आदित्य बिर्ला कॅपिटल (Aditya Birla Capital) फोकसमध्ये आहे कारण कंपनीतील उपकंपनी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडचे (Aditya Birla Finance Ltd) मर्जर अर्थात विलीनीकरण मंजूर झाले आहे. त्यामुळेच ब्रोकरेजने स्टॉकवरील टारगेट अपग्रेड केले आहे.
आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड या उपकंपनीचे आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये मर्जर मंजूर करण्यात आले आहे. मोठी एकीकृत एनबीएफसी तयार करण्यासाठी या मर्जरला मान्यता देण्यात आली आहे.
या विलीनीकरणामुळे एबी कॅपिटलसाठी मजबूत भांडवल आधार तयार होईल असे एबी ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले. पुढील 9-12 महिन्यांत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याची आशा आहे. एनसीएलटी, आरबीआय, एक्सचेंजेसच्या मंजुरीनंतर विलीनीकरणाची अंमलबजावणी केली जाईल.
उपकंपनी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडचे आदित्य बिर्ला कॅपिटलमध्ये विलीनीकरण केल्यानंतर, एबी कॅपिटल होल्डिंग कंपनीकडून एक कार्यरत एनबीएफसी बनेल. तसेच, ग्रुप स्ट्रक्चर सोपे होईल आणि कायदेशीर एनटीएस कमी होईल. भांडवलाचा अधिक चांगला वाटप आणि वापर होईल.
बीएसईवर आदित्य बिर्ला कॅपिटलचे शेअर्स 3.25 टक्क्यांच्या वाढीसह 185 रुपयांवर ट्रेड करत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने स्टॉकवर आपले बाय रेटिंग कायम ठेवले आहे. शेअरवरील टारगेट 225 रुपये करण्यात आले आहे, जे आधी 200 रुपये होते.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.