Share Market : ऍग्री केमिकल कंपनीकडून 300% डिव्हिडेंडची घोषणा ; 3 महिन्यात 239 कोटीचा नफा

कृषी रसायन कंपनी धानुका ॲग्रीटेक लिमिटेडच्या (Dhanuka Agritech) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. त्यामुळेच गुंतवणुकरांचा विश्वास कंपनीवर अबाधित आहे.
Share Market
Share Marketsakal
Updated on

कृषी रसायन कंपनी धानुका ॲग्रीटेक लिमिटेडच्या (Dhanuka Agritech) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. त्यामुळेच गुंतवणुकरांचा विश्वास कंपनीवर अबाधित आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. मागील आर्थिक वर्षात धानुका ॲग्रीटेक लिमिटेडचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट 2.39% वाढून 239.09 कोटी झाला आहे.

एक वर्षापूर्वी 2022-23 मध्ये हाच कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट 233.50 कोटी होता असे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले. कंपनीने निकालासह 300% लाभांश जाहीर केला. कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे.

धानुका ऍग्रीटेक लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एमके धानुका म्हणाले, अल निनो आणि अस्थिर बाजार परिस्थितीमुळे 2023 मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असूनही, कंपनीची कामगिरी समाधानकारक आहे. कंपनीच्या उत्पादनांना शेतकरी समुदायाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले.

कंपनीच्या संचालक मंडळाने 2 रुपयांचे फेस व्हॅल्यूच्या प्रति इक्विटी शेअर 6 रुपये अर्थात 300% लाभांश देण्याची शिफारस केली आहे. बोर्डाने लाभांशाची रेकॉर्ड तारीख 19 जुलै 2024 निश्चित केली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.