Upcoming IPO: वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आणखी एक IPO खुला होणार, एक शेअर किती रुपयांना मिळणार?

Upcoming IPO: पाईप बनवणारी कंपनी एआयके पाइप्स अँड पॉलीमर्सचा (AIK Pipes and Polymers) 26 डिसेंबरला उघडेल आणि 28 डिसेंबरला बंद होईल. त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी प्रति शेअर 89 रुपयांचा प्राईस बँड निश्चित केला आहे.
AIK Pipes and Polymers sets IPO price at Rs 89 per share; issue opens Dec 26
AIK Pipes and Polymers sets IPO price at Rs 89 per share; issue opens Dec 26 Sakal
Updated on

Upcoming IPO: पाईप बनवणारी कंपनी एआयके पाइप्स अँड पॉलीमर्सचा IPO (AIK Pipes and Polymers) 26 डिसेंबरला उघडेल आणि 28 डिसेंबरला बंद होईल. त्यांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी प्रति शेअर 89 रुपयांचा प्राईस बँड निश्चित केला आहे.

या इश्यूमध्ये 16.88 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील. कंपनीला या इश्यूमधून 15.02 कोटी उभारण्याची आशा आहे. या इश्यूनंतर त्याचे शेअर्स बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट केले जातील.

AIK Pipes and Polymers sets IPO price at Rs 89 per share; issue opens Dec 26
LIC Share: LIC चे शेअर्स एक वर्षाच्या नवीन उच्चांकावर; तेजीमागे काय आहे कारण?

गुंतवणुकदारांना अर्जासाठी किमान लॉट साईज 1,600 शेअर्स आणि त्यानंतर 1,600 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल. म्हणजेच गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 1,42,400 रुपये गुंतवावे लागतील. इश्यूमधून मिळणारे पैसे कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी, वर्किंग कॅपिटल आणि सामान्य कॉर्पोरेट खर्चासाठी वापरले जातील.

AIK Pipes and Polymers sets IPO price at Rs 89 per share; issue opens Dec 26
ऑर्डर मिळाल्यानंतर 'या' शेअरमध्ये झाली जबरदस्त वाढ, यावर्षी आतापर्यंत 250 टक्के परतावा

एआयके पाईप्स आणि पॉलिमर्स ही एमडीपीई (मीडियम डेंसिटी पॉलीथीन) पाईप्स आणि पीपीआर (पॉलीप्रॉपिलीन रँडम) पाईप्सची पाणी वितरण, गॅस ट्रान्समिशन, सीवरेज सिस्टीम आणि टेलीकॉम सेक्टर्समधील एक आघाडीची उत्पादक आहे. श्रेणी शेअर्स लिमिटेड ही इश्यूची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस आयपीओसाठी रजिस्ट्रार आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.