Air Bus : एअरबसकडून डायनॅमिक टेक्नॉलॉजी या भारतीय कंपनीला विमानाचे दरवाजे बनविण्याची ऑर्डर......

एअरबसने A220 विमानांचे सर्व दरवाजे बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका भारतीय कंपनीला दिले आहे. हे कंत्राट बेंगळुरूस्थित डायनॅमिक टेक्नॉलॉजीला देण्यात आले आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या विस्तारासाठी हे महत्त्वाचे मानले जात आहे.
Air Bus
Air Bussakal
Updated on

एअरबसने A220 विमानांचे सर्व दरवाजे बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट एका भारतीय कंपनीला दिले आहे. हे कंत्राट बेंगळुरूस्थित डायनॅमिक टेक्नॉलॉजीला देण्यात आले आहे. 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या विस्तारासाठी हे महत्त्वाचे मानले जात आहे. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी एका कार्यक्रमात गुरुवारी ही घोषणा केली.

Air Bus
Life Insurance Corporation Of India : ‘एलआयसी’ला तिमाहीत ९४४४ कोटींचा नफा

डायनॅमिक टेक्नॉलॉजीज ही कंपनी एअरबस A330 आणि A320 विमानांसाठी 'फ्लॅप ट्रॅक बीम' तयार करते. भारतीय वैमानिक उत्पादन कंपनीसाठी हा सर्वात मोठा निर्यात करार आहे. 2023 मध्ये टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडला A320 विमानांच्या 'बल्क' आणि 'कार्गो' दरवाजांच्या निर्मितीचे कंत्राट दिले होते.

एअरबससाठी भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सिंधीया म्हणाले. यामागील उद्दिष्ट देशातून विमानाच्या घटकांचे 'सोर्सिंग' 1.5 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढवण्याचे आहे. गेल्या वर्षी ते 75 कोटी डॉलर होते. एअरबसच्या ऑर्डरच्या बातमीने कंपनीच्या शेअरमध्ये चांगली वाढ दिसून आली. दिवसभरात कंपनीचे शेअर्स 5.62 टक्क्यांच्या वाढीसह 7375.05 रुपयांवर व्यवहार करत होते. या कंपनीने गेल्या 1 वर्षात 173 टक्के परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.