Akums Drugs IPO: एकम्स ड्रग्सचा आयपीओ लवकरच येणार; 'इतके' कोटी उभारण्याचा प्लॅन

Akums Drugs and Pharmaceuticals IPO: एकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड (Akums Drugs and Pharmaceuticals) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे.
Akums Drugs and Pharmaceuticals IPO
Akums Drugs and Pharmaceuticals IPOSakal
Updated on

Akums Drugs and Pharmaceuticals IPO: एकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड (Akums Drugs and Pharmaceuticals) आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे.

ड्राफ्ट पेपर्सनुसार, या आयपीओअंतर्गत 680 कोटीचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याव्यतिरिक्त, 1.86 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) विकले जातील.

या ओएफएसमध्ये संजीव जैन आणि रुबी क्यूसी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड शेअर्स विकणार आहेत. कंपनी प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे 136 कोटी उभारण्याचा विचार करत आहे. असे प्लेसमेंट केल्यास, नवीन इश्यूची साईज कमी होईल. (Akums Drugs files draft IPO papers with Sebi; eyes Rs 680 cr via fresh issue)

आयपीओमधून जमा होणारा निधी कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय कंपनी फंडाच्या माध्यमातून खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करेल. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, ॲक्सिस कॅपिटल, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया आणि ॲम्बिट प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रनिंग लीड मॅनेजर आहेत.

एकम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेडची स्थापना सन 2004 मध्ये झाली. एकम्स ही एक फार्मास्युटिकल कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग संस्था (CDMO) आहे. कंपनी भारतात आणि परदेशात फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसची सेवा वितरीत करते

Akums Drugs and Pharmaceuticals IPO
Paytm Crisis: पेटीएमला मोठा धक्का! पेटीएम पेमेंट बँकेवर फेमा अंतर्गत गुन्हा दाखल, पुढे काय होणार?

30 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रमुख क्लायंटमध्ये ॲलेम्बिक फार्मास्युटिकल्स, अल्केम लॅबोरेटरीज, सिप्ला, डाबर इंडिया, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.

Akums Drugs and Pharmaceuticals IPO
Paytm QR Code: किराणा दुकानदार चिंतेत! पेटीएम क्यूआर कोड चालू राहणार की बंद होणार? कंपनीने दिले स्पष्टीकरण

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.