Alok Industries: अंबानींचा एक निर्णय अन् आलोक इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये दमदार तेजी

Alok Industries: आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स 7 टक्क्यांनी वाढले आहेत.
Alok Industries stock soars 7 percent after board nod to Rs 3,300 crore NCD issue to Reliance Industries
Alok Industries stock soars 7 percent after board nod to Rs 3,300 crore NCD issue to Reliance Industries Esakal
Updated on

Alok Industries: आलोक इंडस्ट्रीजचे शेअर्स नुकतेच सुमारे 7 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या हा शेअर 19.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या बोर्डाने त्याची मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला नॉन-कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स (NCRPS) जारी करून 3,300 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी होताना दिसत आहे.

आलोक इंडस्ट्रीजने एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की ती खासगी प्लेसमेंटच्या आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीजला प्रत्येकी 1 रुपयाच्या 3,300 कोटीचे एनसीआरपीएस जारी करत आहे. रिलायन्सला एनसीआरपीएसवर वार्षिक 9 टक्के दराने डिव्हिडेंड दिला जाईल.

आलोक इंडस्ट्रीजने सांगितले की, प्रेफरन्स शेअर्स वाटपाच्या तारखेपासून 20 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह रिलायन्सच्या ऑप्शनवर कधीही रिडीम करता येतील. शिवाय, कंपनीने सांगितले की जारी केलेले प्रेफरन्स शेअर्स कोणत्याही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जाणार नाहीत.

2019 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याचे भागीदार जेएम फायनान्शियलने दिवाळखोरी प्रक्रियेद्वारे अलोक इंडस्ट्रीजला 5,000 कोटींना विकत घेतले होते. त्यांची बँकांकडे 30,000 कोटीची थकबाकी होती. सप्टेंबरच्या अखेरीस रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आलोक इंडस्ट्रीजमध्ये 40% आणि जेएम फायनान्शियल एआरसीकडे सुमारे 35% हिस्सा होता.

Alok Industries stock soars 7 percent after board nod to Rs 3,300 crore NCD issue to Reliance Industries
Tata Group: टाटा समूह 70 वर्षे जुनी कंपनी विकणार? गुंतवणूकदारांमध्ये नाराजी, शेअर्समध्ये मोठी घसरण

आलोक इंडस्ट्रीज ही तोट्यात चालणारी कंपनी आहे. मात्र, हा तोटा कमी करण्यात कंपनीला यश आले आहे. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 175 कोटींचा कंसोलिडेटेड तोटा सहन करावा लागला, हाच तोटा एक वर्ष आधी 192 कोटी आणि एका तिमाहीपूर्वी 226 कोटी होता. कंसोलिडेटेड रेव्हेन्यू मागील वर्षाच्या तुलनेत 20% कमी झाला आणि तिमाही आधारावर जवळपास 4% कमी होत तो आता 1,359 कोटी रुपये झाला.

Alok Industries stock soars 7 percent after board nod to Rs 3,300 crore NCD issue to Reliance Industries
Share Market Today: बजाज फायनान्स, रिलायन्स आणि पेज इंडियासह आज हे 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.