Adani New IPO: अदानी समुहाची आणखी एक कंपनी होणार लिस्ट? लवकरच येऊ शकतो नवीन IPO

अदानी समूहाच्या कंपनीचा IPO 1,000 ते 1,500 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो
Adani New IPO
Adani New IPOSakal
Updated on

Adani New IPO: हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर आल्यानंतर, अदानी समूहाला त्यांच्या प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द करावा लागला, गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागले.

या अहवालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू झाली आणि कंपनीला पैसे उभारण्यात अडचणी येऊ लागल्या.

आता अदानी समूह स्टॉक मार्केटमध्ये दुसरी कंपनी सूचीबद्ध करून पैसे उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे, ज्यासाठी कंपनी आयपीओ आणू शकते.

अदानी समूह त्यांच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी अदानी कॅपिटलचा IPO आणू शकते. या माध्यमातून कंपनी बाजारातून अनेक कोटी रुपये जमवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासह, समूह आपल्या इतर प्रमुख कंपन्यांसाठी पैसे उभारू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी समूहाच्या या कंपनीचा IPO 1,000 ते 1,500 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. अदानी कॅपिटल सध्या प्रामुख्याने एमएसएमई आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करत आहे.

Adani New IPO
RBI Rule: तुम्ही तुमच्या बँक खात्यात किती रुपयांची नाणी जमा करू शकता? काय आहे RBIचा नियम

काही खासगी इक्विटी फंडांनीही या कंपनीत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी अदानी कॅपिटलने या कराराची जबाबदारी गुंतवणूक बँक एव्हेंडस कॅपिटलला दिली आहे.

अ‍ॅव्हेंडस कॅपिटलने या वृत्तावर भाष्य करण्यास नकार दिला असला, तरी अशा आयपीओच्या योजनेला अदानी समूहानेही दुजोरा दिला आहे.

अदानी कॅपिटलमध्ये समूहाचा 90% हिस्सा:

अदानी समूहाचा अदानी कॅपिटलमध्ये 90 टक्के हिस्सा आहे. तर उर्वरित 10 टक्के व्यवस्थापनाकडे आहे. येत्या दोन ते तीन वर्षात कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता 10 ते 12 हजार कोटी रुपयांची असेल.

2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीची व्यवस्थापनाखालील मालमत्ता 3,977 कोटी रुपये होती.अदानी समूह केवळ अदानी कॅपिटलच नव्हे तर अदानी एंटरप्रायझेससाठी 12,500 कोटी रुपये आणि अदानी ट्रान्समिशनसाठी 8,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.

Adani New IPO
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.