मुकेश अंबानींची कॉफी मार्केटमध्ये एंन्ट्री! आता 'कॉफी'च्या साम्राज्यासाठी टाटा-अंबानींमध्ये होणार टक्कर

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुपमध्ये पुन्हा एकदा नवे आर्थिक युद्ध सुरू होणार आहे.
Tata-Ambani
Tata-AmbaniSakal
Updated on

Tata-Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुपमध्ये पुन्हा एकदा नवे युद्ध सुरू होणार आहे. हे युद्ध कॉफीचे साम्राज्य मिळवण्यासाठी असेल. त्यासाठी मुकेश अंबानी यांनी विदेशी डावपेच सुरू केले आहेत.

ब्रिटीश ऑरगॅनिक कॉफी चेन प्रेट ए मॅनेजरचे देशातील पहिले शॉप उघडण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स सोबत भागीदारी केली आहे. त्याचे पहिले शॉप मुंबईत असेल.

रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (RBL) आणि प्रेट ए मॅनेजर यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, मुंबईत सुरू होणारे स्टोअर 2,567 चौरस फूट असेल आणि त्याचा आकार लंडनच्या शॉपसारखा असेल.

दरम्यान, टाटा समूहाने अमेरिकन कॉफी चेन स्टारबक्ससोबत भागीदारी केली आहे. Tata Consumer Products आणि Starbucks यांच्यातील 50:50 भागीदारीचा संयुक्त उपक्रम आहे.

FY2022 मध्ये 50 नवीन स्टोअर्स सुरू करण्याची योजना आखत आहे. 30 शहरांमध्ये 275 स्टोअर्ससह टाटा स्टारबक्स ही या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली कंपनी आहे.

1986 मध्ये लंडनमध्ये सुरू झाले :

1986 मध्ये लंडनमध्ये सुरू झालेली, प्रीट ए मॅनेजर आता यूके, यूएस, हाँगकाँग, फ्रान्स, दुबई, स्वित्झर्लंड, ब्रसेल्स, सिंगापूर आणि जर्मनी या देशांमध्ये सुमारे 550 स्टोअर्स चालवते.

Tata-Ambani
Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीवर ₹ 5,000 पर्यंत सूट; जाणून घ्या कुठे आहे ऑफर

मेनूमध्ये काय असेल?

मुंबईतील नवीन दुकानात ग्राहकांना सँडविच, बॅगेट्स, सॅलड्स, सूप तसेच कॉफी, चहा आणि शेक मिळेल. प्रिट पिकल आणि पॉश चेडर ग्रॅनरी सँडविच, अॅव्होकॅडो आणि टॉम्स-स्टोन बेक्ड बॅग्युट्स आणि स्मोक्ड सॅल्मन प्रोटीन बॉक्स सॅलड हे मेनूमध्ये लोकप्रिय पर्याय असतील.

त्यात असे नमूद केले आहे की प्रेटच्या ऑनसाइट किचनमध्ये दररोज सर्व पदार्थ हाताने तयार केले जाईल. रिलायन्स ब्रँड्सचे व्यवस्थापकीय संचालक दर्शन मेहता म्हणाले की, भारतातील पहिले प्रीट ए मॅनेजर शॉप उघडताना त्यांना आनंद होत आहे.

स्थानिक प्राधान्यांवर लक्ष केंद्रित :

Pret A Manger चे CEO Pano Christou यांनी सांगितले की, ते भारतीय ग्राहकांसाठी प्रेट ब्रँड ऑफर तयार करण्यासाठी RBL टीमसोबत काम करत आहेत. याशिवाय आम्ही स्थानिक प्राधान्यक्रमही पाहत आहोत.

ते म्हणाले की, भारतात येण्यासाठी मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. मुंबईत आमचे पहिले स्टोअर उघडणे हा आमच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील महत्त्वाचा क्षण आहे.

Tata-Ambani
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.