ASK Automotive IPO: शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आयपीओमधली गुंतवणूक होय. अतिशय कमी काळासाठी तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि यातून भरघोस परतावा मिळू शकतो. फक्त त्यासाठी योग्य आयपीओ शोधून त्यात गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
अशात ऑटो सेक्टरमधील एक कंपनी आपला आयपीओ घेऊन आला आहे. वाहन उपकरणे निर्माण करणारी कंपनी एएसकेऑटोमोटिव्हचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक आणि प्रोट्युस eGov टेक्नोलॉजीजनंतर नोव्हेंबरमधला हा तिसरा आयपीओ आहे.
एएसके ऑटोमोटिव्हचा आयपीओ पूर्णपणे प्रमटर कुलदीप सिंग राठी आणि विजय राठी यांच्या 2,95,71,390 इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित आहे.
आयपीओ 7 नोव्हेंबर अर्थात आज खुला झाला आहे आणि 9 नोव्हेंबरला बंद होईल. आयपीओ ही पूर्णपणे विक्रीची ऑफर असल्याने, त्यातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न कुलदीप सिंग राठी आणि विजय राठी या प्रमोटर्सना जाईल.
यातून कंपनीला काहीही मिळणार नाही. गुरुग्राम स्थित त एएसके ऑटोमोटिव्ह भारतातील दुचाकींसाठी ब्रेक-शूज आणि प्रगत ब्रेकिंग सिस्टम बनवणाऱ्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे.
नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.