Astral Share Market : सीपीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ज बनवणारी कंपनी ऍस्ट्रलच्या (Astral) शेअर्समध्ये सध्या घसरण दिसून येत आहे. पण लाँग टर्मचा विचार केल्यास त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे. आता तर शेअर बाजार तज्ज्ञांना यात तेजी येण्याचा विश्वास वाटत आहे. सध्याच्या पातळीपासून ते सुमारे 24 टक्क्यांनी वाढू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या हे शेअर्स 1911 रुपयांवर ट्रेड करत आहेत. त्याची मार्केट कॅप 38,498.75 कोटी आहे.
पाईप मार्केट मार्च 2023 तिमाहीत मजबूत राहणार आहे आणि प्लंबिंग सेगमेंटच्या जोरावर ऍस्ट्रल पाईपची विक्री वाढण्याची शक्यता देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्यक्त केली आहे. पाईप्स आणि अधेसिव्ह या दोन्हीमध्ये त्याचे ऑपरेटिंग मार्जिन तिमाही आधारावर सुधारण्याची अपेक्षा आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत इन्व्हेंटरीचे लॉस होण्याची शक्यता नाही आणि पीव्हीसी रेझिनच्या किमती स्थिर झाल्यामुळे पाईप सेगमेंटला फायदा होईल.
कंपनीच्या बाथवेअर सेगमेंटमध्ये तेजी दिसून येत आहे आणि कंपनीने फेब्रुवारी 2023 पर्यंत 320 शोरूम/डिस्प्ले सेंटर उघडले आहेत. या सगळ्यामुळे, ब्रोकरेज फर्मने 2,373 रुपयांच्या टारगेटसह स्टॉकवर बाय रेटिंग कायम ठेवली आहे. ऍस्ट्रलचे शेअर्स 30 डिसेंबर 2011 रोजी फक्त 15.50 रुपयांना होते. आता ते 123 पटीने वाढत 1911 रुपयांवर गेले आहे. म्हणजेच त्यावेळची 83 हजार रुपयांची गुंतवणूक अवघ्या 12 वर्षांत एक कोटीपर्यंत गेली आहे.
गेल्या वर्षी 20 जून 2022 रोजी त्याची किंमत 1584 रुपये होती. हा एका वर्षातील नीचांक आहे. यानंतर, 9 सप्टेंबर 2022 रोजी 68 टक्क्यांनी वाढून 2,654 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. त्यानंतर मात्र ही तेजी थांबली आणि सध्या ती या पातळीपासून 28 टक्क्यांनी खाली आहे. सध्याच्या पातळीपासून 24 टक्के रिकव्हरी होऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.