Upcoming IPO: एथर एनर्जीची (Ather Energy) गणना देशातील पहिल्या इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांमध्ये केली जाते. आता ही कंपनी शेअर बाजारात उतरणार असल्याची बातमी आहे. एका वृत्तवाहिनीच्या सूत्रांनुसार, एथर एनर्जी पुढील वर्षी दिवाळीपर्यंत किंवा 2025 च्या सुरुवातीला आपला आयपीओ लाँच करू शकते. कंपनी मार्च 2024 पर्यंत यासाठी गुंतवणूक बँकर्सची नियुक्ती करू शकते.
एथर एनर्जी कंपनी 2013 मध्ये आयआयटी मद्रासच्या दोन विद्यार्थ्यांनी - तरुण मेहता आणि स्वप्नील जैन यांनी सुरू केली होती. एथरने आतापर्यंत देशात सुमारे 1.73 लाख इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. सध्या देशातील चार सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांमध्ये एथरची गणना केली जाते. सध्या त्यांची मुख्य स्पर्धा ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस आणि बजाज ऑटोशी आहे.
सध्या कंपनीचा इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये जवळपास 12% मार्केट शेअर आहे. एथर एनर्जीने अलीकडेच हाय परफॉर्मंस असलेल्या '450 Apex' स्कूटरचे अनावरण केले आणि कंपनी लवकरच त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
एथर एनर्जीने आधीच आयपीओ लाँच करण्याची योजना आखली होती, पण सरकारने ईव्ही सबसिडी कमी केल्यामुळे योजना लांबणीवर पडली. मात्र, आता कंपनी यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने देखील एथर एनर्जीमध्ये पैसे गुंतवले आहेत. या कंपनीत हिरो मोटोकॉर्पची 34% हिस्सेदारी आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की एथर आयपीओ लाँच करण्यापूर्वी एक फंडिंग राउंडही उघडू शकते.
सध्या कंपनीचे मुख्य लक्ष विक्री वाढवण्यावर आहे. कंपनी दर महिन्याला 15-20 नवीन स्टोअर्स उघडत आहे. 2024 च्या अखेरीस किमान 400-450 स्टोअर्स उघडण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.