RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

Bajaj Finance Share: बजाज फायनान्ससाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बजाज फायनान्सच्या ईकॉम आणि ऑनलाइन डिजिटल इंस्टा ईएमआय कार्डवरील बंदी तात्काळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Bajaj Finance Share:  Bajaj Finance shares surge as RBI lifts ban
Bajaj Finance Share: Bajaj Finance shares surge as RBI lifts banSakal
Updated on

Bajaj Finance Share: बजाज फायनान्ससाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बजाज फायनान्सच्या ईकॉम आणि ऑनलाइन डिजिटल इंस्टा ईएमआय कार्डवरील बंदी तात्काळ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज बजाज फायनान्सचे शेअर्स 7.50 टक्क्यांहून अधिक वाढले.

BSE वर शेअर 7.54 टक्क्यांनी वाढून 7,400 रुपये आणि NSE वर 7.51 टक्क्यांनी वाढून 7,400 रुपयांवर पोहोचला. कंपनीचे बाजारमूल्य 23,008.1 कोटी रुपयांनी वाढून 4,49,205.63 कोटी रुपये झाले.

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बजाज फायनान्सला त्यांच्या दोन कर्ज उत्पादन ईकॉम आणि इंस्टा ईएमआय कार्ड अंतर्गत कर्ज मंजूर करणे आणि वितरण थांबविण्याचे निर्देश दिले होते. डिजिटल कर्ज मार्गदर्शक तत्त्वांच्या तरतुदींचे पालन न केल्यामुळे ही बंदी घालण्यात आली होती.

कंपनीने गुरुवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आरबीआयने 2 मे 2024 रोजीच्या आपल्या पत्राद्वारे, सुधारात्मक आधारावर ई-कॉम आणि ऑनलाइन डिजिटल 'इंस्टा ईएमआय कार्ड' वरील बंदी मागे घेतली आहे. बजाज फायनान्सने सांगितले की ते आता कर्ज मंजूरी आणि ईएमआय कार्ड जारी करण्यासह दोन्ही व्यवसाय विभागांमध्ये वितरण पुन्हा सुरू करेल.

Bajaj Finance Share:  Bajaj Finance shares surge as RBI lifts ban
Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

आरबीआयने हे निर्बंध हटवल्यानंतर आज बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ होत आहे. गुरुवारी बजाज फायनान्सचे शेअर्स 28 रुपयांनी घसरले आणि प्रति शेअर 6,895 रुपयांवर बंद झाले होते. मात्र, आज कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.

आज कंपनीचे शेअर्स 6.19% वाढून 7,308.95 प्रति शेअर वर ट्रेडिंग करत आहेत. या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना 18.26% परतावा दिला आहे. त्याची 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी 8,192 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची सर्वात कमी पातळी 6,155.95 रुपये प्रति शेअर आहे.

Bajaj Finance Share:  Bajaj Finance shares surge as RBI lifts ban
IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

गेल्या काही दिवसांत आरबीआयने अनेक कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. अलीकडेच कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयने बंदी घातली आहे. आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास आणि क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे. डेटा सुरक्षेतील गंभीर चुका आणि त्याचे पालन न केल्यामुळे हे निर्बंध लादण्यात आले आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.